संशोधक डॉ. नवाज शेख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:08 AM2021-06-28T04:08:05+5:302021-06-28T04:08:05+5:30
बारामती: शिंदेवाडी येथील डॉ. नवाज नजीर शेख यांना महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे त्यांच्या रोल ऑफ टॉल लाईक ...
बारामती: शिंदेवाडी येथील डॉ. नवाज नजीर शेख यांना महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे त्यांच्या रोल ऑफ टॉल लाईक रिसेप्टार इनएचआयव्ही इनफेक्शन या विषयावरील सादर केलेल्या शोध निबंधासाठी, फॅकल्टी- मेडिसिन, सब्जेक्ट- मेडिकल मायक्रोबायोलॉजीसाठी पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. डॉ. शेख हे आयसीएमआर - नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट पुणे येथे संशोधक म्हणून सध्या कार्यरत आहेत.
डॉ. नवाज नजीर शेख यांना त्यांना या संशोधनासाठी आयसीएमआर, नवी दिल्लीची सिनिअर रिसर्च फेलोशिफ मिळाली होती. त्यांचे या विषयातील तीन शोध आंतरराष्ट्रीय नियतकालिक -एड्स रिसर्च अॅन्ड ह्युमन रिर्ट्रो व्हायरसेस यामध्ये प्रसिद्ध झाले आहेत. तसेच त्यांना आंतरराष्ट्रीय एड्स रिसर्च कॉन्फरन्समध्ये त्यांच्या पोस्टर प्रझेंटेशनला प्रथम क्रमांकाचे पारितोषिकही मिळाले आहे. त्यांनी आपल्या पीएच.डी. कार्यकालादरम्यान कोविड-१९ संबंधित दोन पेटेंट फाईल केल्या आहेत. सदर कामी त्यांना आयसीएमआर - नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट, पुणे येथील शास्त्रज्ञ डॉ. माधुरी ठकार यांनी मार्गदर्शन केले. डॉ. नवाज नजीर शेख यांच्या यशाबद्दल आयसीएमआरचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. रमन गंगाखेडकर व नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट, पुणे येथील शास्त्रज्ञ व तंत्रज्ञ वर्ग, बी. जे. मेडिकल व ससबन हॉस्पिटलच्या डॉ. रेनू भारद्वाज तसेच शिंदेवाडी गावचे ग्रामस्त, मातागीर आधार प्रतिष्ठान, जहॉंगीर मुलानी, नितीन मगर, धनंजय रोकडे, डॉ. नीलेश लिंबोरे, बापूराव मुळीक व यांनी शेख यांचा सत्कार केला.
डॉ. नवाज शेख
२७०६२०२१-बारामती-०३