स्मशानभूमीच्या निकृष्ट बांधकामाबाबत ग्रामस्थांची नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 12:58 AM2018-11-13T00:58:17+5:302018-11-13T00:58:53+5:30

गोलापूर स्मशानभूमी : जिल्हा परिषद मुख्याधिकाऱ्यांकडे करणार तक्रार

Resentment to the villagers about poor work | स्मशानभूमीच्या निकृष्ट बांधकामाबाबत ग्रामस्थांची नाराजी

स्मशानभूमीच्या निकृष्ट बांधकामाबाबत ग्रामस्थांची नाराजी

googlenewsNext

कडूस : खेड तालुक्यातील कडूस ग्रामपंचायतीच्या अखत्यारितील गोलापूर या शिवारासाठी जिल्हा परिषद फंडामधून नव्याने मंजूर झालेल्या स्मशानभूमीचे काम एक वर्षापासून सुरू आहे. काही दिवसांपासून स्लॅबचे काम कंत्राटदारांच्या सवडीनुसार चालू असून बांधकामात सदोषता आढळून आल्याने गोलापूर येथील ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मुदतबाह्य झालेल्या सिमेंटच्या वापराने स्लॅब व कॉलमचे बांधकाम ठिसूळ झाल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे भविष्यात जीवितहानी होण्याची शक्यता असल्याचे लेखी निवेदनात म्हटले आहे. हे बांधकाम चालू असताना कंत्राटदाराकडे ग्रामस्थांनी व ग्रा. पं. सदस्या सत्यभामा वारे यांनी हरकत घेऊन कामात सुधारणा करण्याची सूचना केली होती.

या निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत खेड पंचायत समितीच्या अधिकाºयांशी वारे यांनी संपर्क साधून कामातील सुधारणेबाबत विनंती केली.
याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे लेखी वस्तुस्थिती मांडणार असल्याचे नाना नाईकोडे, सुदाम वारे, पोलीसपाटील सुशील पोटे यांनी सांगितले.

 

Web Title: Resentment to the villagers about poor work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे