खेड तालुक्यात आरक्षणे बदलली

By Admin | Published: June 10, 2017 01:54 AM2017-06-10T01:54:14+5:302017-06-10T01:54:14+5:30

खेड तालुक्यातील १३९ रिक्त पोलीस पाटलांचे ११४ गावांचे फेरआरक्षण आज पुन्हा काढण्यात आले. यात अनुसूचित जाती

Reservations in Khed taluka changed | खेड तालुक्यात आरक्षणे बदलली

खेड तालुक्यात आरक्षणे बदलली

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
राजगुरुनगर : खेड तालुक्यातील १३९ रिक्त पोलीस पाटलांचे ११४ गावांचे फेरआरक्षण आज पुन्हा काढण्यात आले. यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती (ब) हे आरक्षण आहे तसेच ठेवून उर्वरित प्रवर्गांची फेरआरक्षण सोडत काढण्यात आली.
तीन दिवसांपूर्वी पोलीस पाटलांची आरक्षण सोडत काढण्यात आली होती. मात्र, दि. ८ रोजी पुन्हा आरक्षणे बदलली. २००८च्या आदेशाप्रमाणे ही आरक्षण सोडत अनुसूचित जाती, अनुसूचित
जमाती, विशेष मागासवर्ग, विमुक्त जाती (अ), भटक्या जमाती (ब), भटक्या जमाती (क), भटक्या
जमाती (ड), इतर मागास प्रवर्ग व खुला वर्ग अशा क्रमाने काढणे आवश्यक होते.
मात्र, हे आरक्षण बिंदुप्रणालीनुसार काढल्याने त्यात पुन्हा तांत्रिक बदल करून फेरआरक्षण सोडत काढण्यात आली. या वेळी उपविभागीय आधिकारी सुनील गाढे, प्रभारी तहसीलदार अंजली मरोड, गटविकास अधिकारी इंदिरा आस्वार, खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव, जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, पंचायत समिती सदस्य भगवान पोखरकर, अंकुश राक्षे, अमर कांबळे, ज्योती अरगडे, पोलीस पाटील संघटनचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांच्यासह विविध गावांचे सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.
अनुसूचित जाती : धुवोली, येणिये खुर्द (महिला), येलवाडी, खराबवाडी, येणिये बुद्रुक, पिंपळगावतर्फे चाकण, कडाचीवाडी (महिला), विऱ्हाम, कुरुळी (महिला), पांगरी. अनुसूचित जमाती (अनुसूचित जमाती) : तोरणे खुर्द, पाभे, भिवेगाव, धामणगाव खुर्द (महिला), धामणगाव बुद्रुक, नायफड, एकलहरे, खरपूड (महिला), मोरोशी, भोमाळे (महिला), टोकावडे (महिला), कोयाळीतर्फे वाडा. विशेष मागास प्रवर्ग : कान्हेवाडी बुद्रुक, चांडोली, मेदनकरवाडी, गोलेगाव (महिला). विमुक्त जाती (अ) : कन्हेरसर, वाकी खुर्द, चिंचोशी (महिला), सिद्धेगव्हाण (महिला), रोहकल. भटक्या जमाती (ब) : कुरकुंडी, कोहिंडे बुद्रुक औदर (महिला). भटक्या जमाती (क) : कोयाळीतर्फे चाकण (महिला), कडूस, चऱ्होली खुर्द, आंबोली (महिला), नाणेकरवाडी, वाजवणे. भटक्या जमाती (ड) : शिंदे, भांबोली, कोरेगाव बुद्रुक, बुट्टेवाडी (महिला). इतर मागासप्रवर्ग : कान्हेवाडी खुर्द, शिरगाव, गारगोटवाडी, वरुडे, पूर, सुरकुंडी (महिला), चिंबळी, बहिरवाडी, शेलगाव (महिला), चास (महिला), निघोजे, शिवे, काळूस, भोरगिरी (महिला), शेंदुर्ली, पाडळी, वडगाव घेनद, आसखेड खुर्द (महिला), डेहणे, मोहकल, महाळुंगे, धामणे, वाळद (महिला), जऊळके खुर्द (महिला), सातकरस्थळ, आखरवाडी, मंदोशी (महिला), आढे, बुरसेवाडी (महिला), कमान.
सर्वसाधारण आरक्षण : देशमुखवाडी, कान्हेवाडीतर्फे चाकण, आभू, बिरदवडी, दावडी, करंजविहीरे, तिफनवाडी, वाकीतर्फे वाडा, आंबेठाण, कोळीये, वासुली, केळगाव, वाघू, सांगुर्डी (महिला), हेंदृज (महिला), पाळू, तळवडे, सावरदरी, पिंपरी खुर्द, सुपे, दरकवाडी, टेकवडी (महिला), कोहिंडे खुर्द, जैदवाडी (महिला), कहू (महिला), साबुर्डी, वाशेरे, कोरेगाव खुर्द (महिला), राक्षेवाडी, वांद्रा, कारकुडी, आसखेड बुद्रुक, परसूल (महिला), साकुर्डी, घोटवडी (महिला), आव्हाट, गुंडाळवाडी, औंढे (खुला गर्व) : गाडकवाडी (महिला), चिंचबाईवाडी, पराळे (महिला), आरुडेवाडी (महिला), काळेचीवाडी (महिला), ढोरेवाडी, किवळे (महिला), खालची भांबुरवाडी (महिला), कोहिणकरवाडी, टाकळकरवाडी, पाचारणेवाडी, मांजरेवाडी, साबळेवाडी, वरची भांबुरवाडी, पापळवाडी, सांडभोरवाडी, कासारी, गुळाणी, संतोषनगर, तोरणे बुद्रुक (महिला), आडगाव, होलेवाडी, भलवडी (महिला), बहूळ, मिरजेवाडी (महिला), अनावळे (महिला) अहिरे (महिला).

Web Title: Reservations in Khed taluka changed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.