आरक्षणेच उठविली!

By admin | Published: May 23, 2017 05:30 AM2017-05-23T05:30:36+5:302017-05-23T05:30:36+5:30

हितसंबंधितांच्या फायद्यासाठी राजगुरुनगर शहराच्या नगररचना विभागाने बनविलेल्या मूळ आराखड्यातच बदल करून आरक्षणे उठविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे

Reservations raised! | आरक्षणेच उठविली!

आरक्षणेच उठविली!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
राजगुरुनगर : हितसंबंधितांच्या फायद्यासाठी राजगुरुनगर शहराच्या नगररचना विभागाने बनविलेल्या मूळ आराखड्यातच बदल करून आरक्षणे उठविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नगरसेवकांनी ८ ते १० बदल सुचवून आरक्षणे उठविली आहेत. नगर परिषदेच्या पूर्व भागापेक्षा उत्तर आणि पश्चिम भागात जास्त आरक्षणे पडल्याचे स्पष्ट झाले आहे. मोठ्या प्रमाणात निवासी झोन करण्यात आले आहेत.
राजगुरुनगर नगर परिषद होऊन दोन वर्षे झाल्यानंतर अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शहराचा विकास आराखडा तयार झाला. उपनगराध्यक्ष संदीप सांडभोर यांनी सोमवारी आराखड्याबाबत माहिती दिली. नगररचना विभागाने प्रत्यक्ष जागेची पाहणी करून आवश्यकतेनुसार नगररचना विभागाने सूचना सुचविल्या होत्या. मात्र नगरसेवकांनी त्यामध्ये फेरबदल केले आहेत. नगरसेवकांनी ४८ आरक्षणे सुचवली होती. त्यानुसार बदल करण्यात आले आहेत. उद्याने, बगीचा, मैदानासाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. घनकचरा व्यवस्थापनासाठी जागा उपलब्ध होणार आहे. कत्तलखाना रद्द करण्यात आला आहे. नागरिकांना याबाबत हरकतीसाठी महिन्याभराची मुदत देण्यात आली असून यामधे नगर परिषदेचे ३ व नगररचनाचे ४ अधिकारी यांची समिती करण्यात आली असल्याचे सांडभोर यांनी सांगितले.

च्राजगुरुनगर नगर परिषदेने विकास आराखड्यावर १७ मे रोजी नगर परिषद सभागृहात चर्चा करून यामध्ये अनेक बदल करण्यात आले. मात्र हे बदल करताना नगरसेवक व राजकारणी व हितसंबंधित लोकांच्या जागेवरील आरक्षण काढण्यात आल्याचे समोर आले आहे. मात्र सामान्य नागरिक व शेतजमिनीवरील वेगवेगळ्या गोष्टींसाठीचे आरक्षण कायम ठेवण्यात आले.

Web Title: Reservations raised!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.