एसटीतील राखीव आसने नियमांच्या जोखडात    

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2019 07:00 AM2019-11-06T07:00:00+5:302019-11-06T07:00:02+5:30

एसटी म्हणते, बसस्थानकातून बस सुटल्यानंतर ‘राखीव’ नाही

Reserve seats in ST at stuck in the rules | एसटीतील राखीव आसने नियमांच्या जोखडात    

एसटीतील राखीव आसने नियमांच्या जोखडात    

googlenewsNext
ठळक मुद्दे‘एसटी’ बसमध्ये अपंग, महिला, ज्येष्ठ नागरीक, आमदार, खासदार यांच्यासाठी काही आसने राखीव ‘एसटी’नेच असा नियम केलेला असल्याने संबंधित प्रवाशांची कोंडी

पुणे : एसटी महामंडळाच्या बसमधील अपंगांसह महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव असलेली आसने नियमांच्या जोखडात अडकली आहेत. गाडी बसस्थानकात असेपर्यंतच संबंधित आसनांवर अपंग, महिला व इतर आपला हक्क सांगू शकतात. बस सुटण्याच्या ठिकाणी संबंधित आसनांवर इतर प्रवासी बसलेले असल्यास पुढे मार्गात कुठेही त्यांना उठविता येणार नाही, असा अजब नियम एसटीने केलेला आहे. याचा फटका संबंधित घटकांना बसत आहे.

‘एसटी’ बसमध्ये अपंग, महिला, ज्येष्ठ नागरीक, आमदार, खासदार यांच्यासाठी काही आसने राखीव ठेवलेली असतात. आमदार, खासदार वगळता इतर घटक एसटीने नेहमी प्रवास करतात. पण त्यांना अनेकदा या राखीव आसनांचा काहीच उपयोग होत नसल्याचे चित्र आहे. एखाद्या बसस्थानकावरून बस सुटण्यापुर्वी राखीव आसनांवर इतर प्रवासी बसलेला असल्यास काही वेळ आधी तिथे वाहकांकडून आसने रिकामे करून दिले जाऊ शकते. पण एकदा ही बस मार्गस्थ झाल्यानंतर मधल्या कोणत्याही स्थानकात अपंग, महिला किंवा इतर घटकांना त्यांच्या राखीव आसनांवर हक्क सांगता येत नाही. ‘एसटी’नेच असा नियम केलेला असल्याने संबंधित प्रवाशांची कोंडी झाली आहे. 
अपंग हित, विकास व पुनर्वसन संघाचे अध्यक्ष दिपक ढोबळे यांनाही नुकताच असा अनुभव आला. ढोबळे हे पारगावमध्ये जांबूनतकडून परळ कडे जाणाऱ्या एसटी बसमध्ये अपंगांच्या राखीव आसनावर बसले. त्यांना मंचरपर्यंत जायचे होते. पिंपळगाव येथे इतर प्रवासी गाडीमध्ये  बसल्यावर ४ क्रमांकाचे आसनावर आरक्षणाचे तिकीट असल्याचे सांगत त्यांना उठण्यास सांगितले. हे राखीव आसन असल्याने सुरूवातीला त्यांनी उठण्यास नकार दिला. पण एसटीने हे आसन आरक्षित तिकीट दिल्याने उठावे लागले. असा अनुभव संबंधितांना वारंवार येत असल्याची नाराजी ढोबळे यांनी व्यक्त केली. ‘अपंग व्यक्तीला राखीव ठेवलेली आसने इतर लोकांना आरक्षित करून दिली जात असेल आणि अपंग व्यक्तींच्या वाट्याला अन्यायच येत असेल तर अपंग संघाला रस्त्यावर उतरावे लागेल. अपंग किंवा इतर घटकांसाठीची राखीव आसने त्यांना मिळायला हवीत. एसटीने हा नियम बदलण्याची गरज आहे, असे ढोबळे यांनी सांगितले.
----------
एसटी म्हणते, बसस्थानकातून बस सुटल्यानंतर ‘राखीव’ नाही
एसटी मधील अपंगांसाठी राखीव असलेल्या आसनांचे आरक्षण दिल्यानंतर अपंगांनी कुठे बसायचे. वाहकांच्या म्हणण्यानुसार अपंगांच्या राखीव जागेवर बसण्यासाठी गाडी सुटते त्या स्थानकावरुन बसने गरजेचे आहे. पण एखाद्याला शिरुरवरुन पुण्याला यायचे असेल व गाडी बीड -पुणे असेल तर त्याने बसायला बीडला जायचे का? अपंगांना जिथे बसेल तिथेच राखीव आसनांवर जागा दिली पाहिजे.
- हरिदास शिंदे, दिव्यांग चळवळीतील कार्यकर्ते.
..........
जादा गाड्यांना राखीव आसनांचा नियम लागु होत नाही. तसेच इतर गाड्यांमध्ये पहिल्या बसस्थानकातच राखीव आसनांवर संबंधित बसू शकतात. ही गाडी पुढे गेल्यानंतर इतर ठिकाणी राखीव आसनांवर हक्क सांगता येत नाही. या आसनांवर इतर प्रवासी बसलेले असल्यास त्यांना उठविता येत नाही. हा एसटीचा पुर्वीपासूनच नियम आहे. एसटीचा प्रवास लांबपल्याचा असल्याने हा नियम करण्यात आलेला आहे. 
- यामिनी जोशी, वाहतुक नियंत्रक, पुणे विभाग
एसटी महामंडळ

Web Title: Reserve seats in ST at stuck in the rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.