राखीव कोव्हॅक्सिन पहिल्या लसीकरणासाठी वापरण्यास परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:12 IST2021-04-11T04:12:16+5:302021-04-11T04:12:16+5:30
पुणे : कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेल्यांना दुसरा डोस देण्यासाठी राखीव ठेवलेल्या कोव्हॅॅक्सिन लसी पहिल्याच लसीकरणासाठी वापरण्यास शासनाने ...

राखीव कोव्हॅक्सिन पहिल्या लसीकरणासाठी वापरण्यास परवानगी
पुणे : कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेल्यांना दुसरा डोस देण्यासाठी राखीव ठेवलेल्या कोव्हॅॅक्सिन लसी पहिल्याच लसीकरणासाठी वापरण्यास शासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्याला ६७,००० अतिरिक्त डोस उपलब्ध होणार आहेत.
पुणे जिल्ह्यात कोरोना लसींचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे लसीकरण थांबवण्याची वेळ आली. राज्यातही अनेक ठिकाणी तुटवडा निर्माण झाला होता. मात्र या गोंधळीचे वेगळेच कारण समोर आले होते. राज्याकडे कोव्हिशिल्डचा तुटवडा असला तरी प्रत्यक्षात कोव्हॅक्सिन उपलब्ध होते. राज्य सरकारने ५ तारखेला काढलेल्या आदेशानुसार या संपूर्ण लसी दुसऱ्या डोससाठी राखीव ठेवण्यास सांगण्यास आले होत्ते. या लसी शिल्लक असल्याने केंद्र सरकार नव्या लसी कशासाठी द्यायचा, असा सवाल उपस्थित केला होता. ‘लोकमत’ने काल हा गोंधळ उजेडात आणला होता.
पुण्यात शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यानंतर सर्व लसी वापरायला परवानगी देण्यात आली आहे. विभागीय आयुक्त सौरभ राव म्हणाले, “आम्हाला कोव्हॅक्सिन पहिल्या डोसला वापरायला परवानगी मिळाली आहे. त्यामुळे आता काहीसा दिलासा मिळणार आहे”.