निवासी उपजिल्हाधिकारी खराडे, हवेली प्रांत आसवलेंनी पदभार स्वीकारला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:13 AM2021-09-22T04:13:33+5:302021-09-22T04:13:33+5:30
पुणे : पुण्याचे निवासी उपजिल्हाधिकारीपदी हिंमत खराडे तर हवेलीचे प्रांत अधिकारी म्हणून संजय आसवले यांनी मंगळवारी पदभार स्वीकारला. ...
पुणे : पुण्याचे निवासी उपजिल्हाधिकारीपदी हिंमत खराडे तर हवेलीचे प्रांत अधिकारी म्हणून संजय आसवले यांनी मंगळवारी पदभार स्वीकारला.
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची भेट घेऊन हिंमत खराडे आणि संजय आसवले यांनी पदभार स्वीकारला. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांची बदली अंधेरी येथे मुद्रांक जिल्हाधिकारी म्हणून झाली आहे. त्यांच्या जागी खराडे यांची वर्णी लागली आहे. तर हवेलीचे प्रांत सचिन बारवकर यांची बदली सांगली या ठिकाणी भूसंपादन अधिकारी म्हणून करण्यात आलेली आहे. त्यांच्या जागी संजय आसवले आलेले आहेत.
पदभार स्वीकारल्यानंतर खराडे म्हणाले, शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचविण्यावर आपला भर राहणार आहे. पुणे जिल्हा हा राज्यातील महत्त्वाचा जिल्हा असल्याने या ठिकाणी नियोजनबद्ध काम करण्यावर भर राहील. तर आसवले म्हणाले, हवेलीतील प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावू. शासनाच्या योजनांचा फायदा नागरिकांना होणे आवश्यक आहे, त्या दृष्टिकोनातून आपण कार्यरत राहणार आहे.
-----