Pune: रहिवासी इमारतीत हाॅटेल, व्यवसाय अनधिकृत बांधकामावर येणार टाच- आयुक्त विक्रम कुमार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 10:00 AM2023-08-23T10:00:05+5:302023-08-23T10:00:55+5:30

पुणे शहरातील अनधिकृत बांधकामाबाबत पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागातील सर्व अधिकारी आणि कनिष्ठ अभियंत्याची बैठक आयोजित करण्यात आली होती...

Residential buildings, hotels, businesses will come under the heel of unauthorized construction | Pune: रहिवासी इमारतीत हाॅटेल, व्यवसाय अनधिकृत बांधकामावर येणार टाच- आयुक्त विक्रम कुमार

Pune: रहिवासी इमारतीत हाॅटेल, व्यवसाय अनधिकृत बांधकामावर येणार टाच- आयुक्त विक्रम कुमार

googlenewsNext

पुणे : शहराच्या विविध भागांत अनधिकृत बांधकामावर तातडीने कारवाई करावी, त्यासाठी १५ दिवसांचा कालावधी देण्यात येणार आहे. या कालावधीत केलेल्या कारवाईचा अहवाल खात्याकडे सादर करायचा आहे, अन्यथा संबंधित विभागातील कनिष्ठ अभियंत्यावर कारवाई करण्याचा इशारा आयुक्त विक्रम कुमार यांनी दिला आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकामावरील कारवाई वेगाने होणार आहे.

पुणे शहरातील अनधिकृत बांधकामाबाबत पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागातील सर्व अधिकारी आणि कनिष्ठ अभियंत्याची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आयुक्त विक्रम कुमार, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, अधीक्षक अभियंता युवराज देशमुख आदी उपस्थित होते. त्या बैठकीत बोलताना आयुक्तांनी हा इशारा दिला.

पुणे शहराच्या विविध भागांत अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यात रहिवासी इमारतीमध्ये अनधिकृतपणे हॉटेल, अन्य व्यवसाय सुरू केले आहेत. काही ठिकाणी रुफ टॉप हॉटेल आहेत. त्यामुळे आगी लागण्याच्या घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकामावर तातडीने कारवाई करावी, त्यासाठी कनिष्ठ अभियंत्यांना १५ दिवसांचा कालावधी देण्यात येणार आहे. या कालावधीत कनिष्ठ अभियंत्यांनी तातडीने कारवाई करावी. त्या कारवाईचा अहवाल बाधंकाम विभागाकडे सादर करायचा आहे. जे कनिष्ठ अभियंते अनधिकृत बांधकामावर कारवाई करणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा आयुक्त विक्रम कुमार यांनी दिला आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकामावरील कारवाईला वेग मिळणार आहे.

Web Title: Residential buildings, hotels, businesses will come under the heel of unauthorized construction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.