घरकुलमधील रहिवाशांना करात मिळणार सवलत
By Admin | Published: May 8, 2016 03:27 AM2016-05-08T03:27:21+5:302016-05-08T03:27:21+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने केंद्र सरकारच्या जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिकांसाठी राबविण्यात आलेल्या स्वस्त घरकुल योजनेतील
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने केंद्र सरकारच्या जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिकांसाठी राबविण्यात आलेल्या स्वस्त घरकुल योजनेतील रहिवाशांना मालमत्ताकरात सवलत मिळणार आहे.
‘स्वस्त घरकुल प्रकल्पात’ शहरातील अल्पउत्पन्न गटातील नागरिकांना सदनिका देण्यात आली. महापालिकेच्या करआकारणी व करसंकलन विभागामार्फत या सदनिकाधारकांना मालमत्ता कराची बिले देण्यात आली आहेत. दरम्यान, शहरातील विविध संघटनांनी या प्रकल्पातील मालमत्तांना कर आकारू नये अथवा सवलत द्यावी, अशी मागणी केली.
दरम्यान, महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार विशेष विकास प्रकल्पांच्या इमारतीच्या आणि जमिनींच्या बाबतीत राज्य सरकारने अधिसूचनेद्वारे वेळोवेळी निश्चित केलेल्या किंवा कमी केलेल्या दराने मालमत्ताकर आकारण्याची तरतूद आहे. त्यानुसार स्थायी समिती सभा व महापालिका सभा यांनी ठराव करून त्यास शासनाची मान्यता घेणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)