सभापती चेतन घुले यांचा राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2016 01:13 AM2016-03-14T01:13:01+5:302016-03-14T01:13:01+5:30
सहा महिन्यांची मुदत संपल्याने पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळ समितीचे सभापती चेतन घुले यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.
पिंपरी : सहा महिन्यांची मुदत संपल्याने पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळ समितीचे सभापती चेतन घुले यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार घुले महापौर शकुंतला धराडे यांच्याकडे राजीनामा दिला आहे. पुढील आठवड्यात या पदासाठी निवडणूक होणार आहे.
शिक्षण मंडळातील सदस्यांनी सभापती आणि उपसभापतिपदासाठी सर्वांना संधी मिळावी, यासाठी सहा महिन्यांचा फॉर्म्युला ठरला होता. त्यानुसार आॅक्टोबर २०१५ मध्ये चेतन घुले यांना सभापतिपद आणि नाना शिवले यांना बिनविरोध उपसभापतिपद मिळाले होते. त्यांपैकी घुले यांचा सहा महिन्यांचा कालखंड संपुष्टात आल्याने इतरांना संधी मिळावी, म्हणून त्यांनी महापौरांकडे राजीनामा सादर केला आहे. तर शिवले यांना आणखी दोन महिने
काम करण्याची संधी मिळाली. घुले आणि शिवले यांनी विविध उपक्रम राबविले होते. (प्रतिनिधी)