पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाच्या सर्व्हेला शेतकऱ्यांचा विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 12:37 AM2019-02-05T00:37:49+5:302019-02-05T00:38:04+5:30
वाघोली (ता. हवेली) परिसरातून केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पास सुरवातीपासून विरोधाला सामोरे जावे लागत आहे. प्रास्ताविक पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प कोलवडीपासून पुढे बकोरी, भावडी, मरकळ, आळंदी, चाकण, राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव, आळेफाटामार्गे नाशिककडे जाणारा रेल्वे प्रकल्प आहे.
वाघोली - वाघोली (ता. हवेली) परिसरातून केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पास सुरवातीपासून विरोधाला सामोरे जावे लागत आहे. प्रास्ताविक पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प कोलवडीपासून पुढे बकोरी, भावडी, मरकळ, आळंदी, चाकण, राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव, आळेफाटामार्गे नाशिककडे जाणारा रेल्वे प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या वाडेबोल्हाई, बकोरी येथे सर्व्हे करण्यासाठी अधिकारी आले असता स्थानिक शेतकºयांनी या रेल्वे प्रकल्पाचा सर्व्हे अडविण्यात आला तर हा रेल्वे प्रकल्प अजिबात होऊ देणार नाही, असे सर्व्हे अधिकाºयांना तीव्र शब्दांत स्थानिक शेतकरी यांनी सुनावले.
तर शेतक-यांनी ग्रामपंचायतला माहिती देऊन ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी यांना त्वरित बोलावून हा होणारा रेल्वे प्रकल्पाचा सर्व्हे त्वरित थांबविण्यात आला. याविषयी बोलताना वाडेबोल्हाईचे सरपंच दीपक गावडे म्हणाले, या प्रकल्पाचा गावच्या विकासासाठी कोणतीही मदत होणार नाही. शासनाने या प्रकल्पाबाबतीत कोणतीच भूमिका स्पष्ट केलेली नाही. शेतकºयांना मोबदलादेखील अल्प स्वरूपाचा मिळेल, शेतकरी हिताचे निर्णय घ्यावेत, शेतकरी हिताचे नसणारे प्रकल्प करू नयेत. अन्यथा, शेतकरी रस्त्यावर उतरतील. याप्रसंगी माजी सरपंच कुशाभाऊ गावडे, ग्रामपंचायतीचे सरपंच दीपक गावडे, शेतकरी काळूराम गावडे, संभाजी गावडे, तानाजी गावडे, प्रल्हाद गावडे, जयराम गावडे, किसन गावडे, आबा गावडे, विलास गावडे, विठ्ठल गावडे, बोरकर आदी शेतकरी या वेळी उपस्थित होते.
केंद्र सरकारच्या रेल्वे प्रकल्पामध्ये शेतकºयांना विश्वासघात घेतले जात नाही. परिसराला त्याचा काहीच फायदा नाही. कचरा प्रकल्प आमच्याकडे, रेल्वे आमच्याकडे; परंतु याचा फायदा आम्हाला काय?
- चंद्रकांत वारघडे,
माहिती सेवा समिती