महिला सरपंचांविरोधातील ठराव फेटाळला
By admin | Published: May 23, 2017 05:18 AM2017-05-23T05:18:14+5:302017-05-23T05:18:14+5:30
बारामती तालुक्यातील मोठ्या समजल्या जाणाऱ्या वडगाव निंबाळकर ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच आकांक्षा शिंदे यांच्याविरोधात मांडलेला अविश्वासदर्शक ठराव फेटाळण्यात आला
वडगाव निंबाळकर : बारामती तालुक्यातील मोठ्या समजल्या जाणाऱ्या वडगाव निंबाळकर ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच आकांक्षा शिंदे यांच्याविरोधात मांडलेला अविश्वासदर्शक ठराव फेटाळण्यात आला. यामुळे माजी सरपंच सुनील ढोले व उन्मेष शिंदे यांच्या गटाची सत्ता कायम राहिली आहे.
वडगाव निंबाळकर येथील शिवाजी राजेनिंबाळकर, सोमेश्वरचे संचालक संग्रामसिंह राजेनिंबाळकर, राजकुमार शहा यांच्या गटातील आठ सदस्यांनी सरपंच विश्वासात घेऊन काम करीत नसल्याच्या कारणावरून तहसीलदारांकडे अविश्वास ठराव मांडला होता.
यापूर्वी सरपंचांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, याची चौकशी सुरू असताना सरपंचपदावरून हटवण्यासाठी सोळापैकी आठ सदस्यांनी तहसीलदारांकडे अविश्वासाचा ठराव मांडला. याबाबत सदस्यांची खास बैठक तहसीलदार हनुमंत पाटील यांनी सोमवारी (दि. २२) येथील ग्रामसचिवालयात बोलावली होती.
या वेळी ग्रामपंचायतीच्या सोळा सदस्यांपैकी सरपंच आकांक्षा
उन्मेष शिंदे, अनिता शैलेंद्र जाधव, रोहिणी दत्तात्रेय झगडे, सुनील दत्तात्रेय ढोले, संगीता राजकुमार शहा, ज्योती मोहन हिरवे, जयश्री भीमाजी
साळुंके, अर्चना नितीन राऊत,
माणिक शंकर गायकवाड, मनोजकुमार यशवंत साळवे, धैर्यशील दिलीपसिंह राजेनिंबाळकर, रोहिदास सखाराम हिरवे असे बारा सदस्य उपस्थित होते.