साडेचार लाख वृक्ष लागवडीचा संकल्प

By admin | Published: June 29, 2017 03:26 AM2017-06-29T03:26:32+5:302017-06-29T03:26:32+5:30

राज्यात एक जुलैला होणाऱ्या चार कोटी वृक्षलागवड कार्यक्रमांतर्गत शासनाने दिलेल्या उद्दिष्टानुसार वन विभागाच्या भोर उपविभागात भोर

Resolution of planting four and a half lakh trees | साडेचार लाख वृक्ष लागवडीचा संकल्प

साडेचार लाख वृक्ष लागवडीचा संकल्प

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
भोर : राज्यात एक जुलैला होणाऱ्या चार कोटी वृक्षलागवड कार्यक्रमांतर्गत शासनाने दिलेल्या उद्दिष्टानुसार वन विभागाच्या भोर उपविभागात भोर, वेल्हे, पुरंदर मिळून १७५.२५ हेक्टरवर सुमारे २ लाख २१ हजार ५०० वृक्ष, तर इतर शासकीय यंत्रणा १ लाख २१ हजार ५९० वृक्ष, ग्रामपंचायत १ लाख १८ हजार ८३१ अशी एकूण ४ लाख ६१ हजार ९२१ वृक्षलागवड करण्यात येणार असल्याची महिती उपविभागीय वनअधिकारी बी. पी. जाधव यांनी दिली.
लोकांच्या मागणीनुसार विक्री केली जात आहे. या माध्यमातून जनजागृती केली जात असून लागवडीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. सरकारच्या यंत्रणा व विविध विभागांबरोबर तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांतील पदाधिकारी स्वयंसेवी संस्था, ग्रामस्थ शाळा कॉलेजचे विद्यार्थी व महिला मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे बी. पी. जाधव यांनी सांगितले.
तालुक्याच्या प्रत्येक गावातील ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, अंगणवाडी, विविध कार्यकारी संस्था, मोकळी जागा, वन विभागाची जागा, रस्त्याच्या बाजूला खड्डे खोदण्यात आले आहेत. या खड्ड्यांत रोपांची लागवड करण्यासाठी आंबवणे (वेल्हे), भाटघर (भोर), पुरंदर (वीर), जेजुरी येथील रोपे देण्यात येत आहेत. या रोपवाटिकेत जांभूळ अर्जुन, कडूनिंब, आवळा, हिरडा, शिसव, करंज, वड, पुत्रजिवा, काशीद, बकुळ, शिलवर, ओक या रोपांची लागवड करण्यात येणार आहे.
हा वृक्षलागवड कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व विभागांचे अधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य व नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात उपविभागीय वन अधिकारी जाधव यांनी केले आहे.

Web Title: Resolution of planting four and a half lakh trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.