नागरिकांच्या तक्रारींचे घरीबसल्या निराकरण
By admin | Published: March 7, 2016 02:07 AM2016-03-07T02:07:11+5:302016-03-07T02:07:11+5:30
घरासमोर कचरा साठलाय.. ड्रेनेजलाइन तुंबलीय... पाण्याची पाइपलाइन फुटलीय... रस्ता उखडलाय... अनधिकृत बांधकाम झालंय यासह अनेक छोट्या-छोट्या तक्रारींसाठी वॉर्ड आॅफिस
पुणे : घरासमोर कचरा साठलाय.. ड्रेनेजलाइन तुंबलीय... पाण्याची पाइपलाइन फुटलीय... रस्ता उखडलाय... अनधिकृत बांधकाम झालंय यासह अनेक छोट्या-छोट्या तक्रारींसाठी वॉर्ड आॅफिस, महापालिका येथे चकरा माराव्या लागायच्या. आता नागरिकांना या चकरा मारायची आवश्यकता नसून त्यांनी केवळ घरीबसल्या आॅनलाइन तक्रार नोंदविल्यानंतर महापालिकेचेच कर्मचारी तुमच्या घरी येऊन तक्रारीची सोडवणूक केल्याची माहिती देत आहेत. आतापर्यंत साडेचार हजार तक्रारींचे अशा पद्धतीने निराकरण करण्यात आले आहे.
नागरिकांना तक्रार करण्यासाठी महापालिकेच्या संकेतस्थळावर जाऊन आॅनलाइन पद्धतीने तक्रार नोंदविता येते. त्याचबरोबर १ जानेवारी २०१५ पासून पालिकेने फेसबुक, व्हॉट्सअॅप, टिष्ट्वटर, फेसबुक, गुगल अशा सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वीच पालिकेने पुणे कनेक्ट नावाचे मोबाइल अॅप कार्यान्वित केले आहे. यामुळे तक्रार नोंदविणे अत्यंत सोपे झाले आहे. या तक्रारींची सोडवणूक होत आहे की नाही, याचा दररोज आढावा महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडून घेतला जात आहे. आॅनलाइन तक्रारींच्या निराकरणाबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.चांगला प्रतिसाद
महापालिकेकडून १ जानेवारीपासून फेसबुक, टिष्ट्वटर, व्हॉट्सअॅप, एसएमएस, गुगल यावरून तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. त्याला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तक्रारींचे निराकरण झाल्यानंतर समाधान व्यक्त करणारे फिडबॅक नागरिकांकडून आम्हाला मिळत आहेत. - राहुल जगताप,
संगणक विभागप्रमुख, महापालिकाहडपसर भागात अनधिकृतपणे फ्ेलक्स लागले असल्याबाबत मी महापालिकेच्या संकेतस्थळावरून तक्रार नोंदविली होती. त्यानंतर मला माझी तक्रार क्षेत्रीय कार्यालयांतर्गत वर्ग करण्यात आल्याची माहिती मिळाली. त्याचबरोबर महापालिकेने त्या फ्लेक्सवर तातडीने कारवाई केली. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी घरी येऊन माझ्या तक्रारीचे निराकरण झाले असल्याच्या शेरा नोंदवून त्यावर माझी सही घेतली. महापालिकेकडून माझ्या तक्रारीची इतक्या चांगल्या पद्धतीने दखल घेतली गेल्याने मला सुखद धक्का बसला.’’
- अनिकेत राठी