कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न आठ दिवसात मार्गी लावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:11 AM2021-01-22T04:11:54+5:302021-01-22T04:11:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे महापलिका शिक्षण मंडळातील बालवाडी शिक्षिका व सेविकांना राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे किमान वेतन लागू ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे महापलिका शिक्षण मंडळातील बालवाडी शिक्षिका व सेविकांना राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे किमान वेतन लागू करण्याबाबतचा ठराव दोन वर्षापूर्वी सर्वसाधारण सभेने मान्य केला आहे़ त्याची अंमलबजावणी अद्याप न झाल्याने, येत्या आठ दिवसात हा प्रश्न मार्गी लावावा़ असे आदेश महापौर मुरलीधर मोहोळ यांनी गुरूवारी प्रशासनास दिले़
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी शिक्षण मंडळातील सेवकांच्या किमान वेतनाचा प्रश्न मार्गी न लावल्यास कामगार युनियनबरोबरच शिवसेनाही आंदोलन करेल असा इशारा दिला़ महापालिकेतील सेवेतील शिक्षिका व सेविकांना दर दोन वर्षांनी १० टक्के पगारवाढ देण्याचा आदेश आहे़ पण गेली दहा वर्षे तो फरक मिळालेला नाही़ सप्टेंबर,२०१८ मध्ये सर्वसाधारण सभेनेही तसा ठराव मंजूर करून किमान वेतनासह पगारवाढीचा फरकाची रक्कम अदा करण्याबाबत आदेश दिले आहेत़ पण तो अद्याप दिलेला नाही़ दोन वर्षापूर्वी ठराव होऊनही त्याची अंमलबजावणी का होत नाही असा प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित करून आंदोलन करण्याचा इशारा दिला़ यावर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी येत्या आठ दिवसात हा विषय मार्गी लावावा असे आदेश प्रशासनाला दिले़
----
सातवा वेतन आयोग मान्य करा : घाटे
पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा विषय किती दिवस प्रलंबित ठेवणाऱ या महत्वाच्या विषयावर सर्वजण गप्प का आहेत, असे प्रश्न माजी सभागृह नेते धीरज घाटे यांनी सर्वसाधारण सभेत उपस्थित केले़ सातवा वेतन आयोग इतर संस्थांमध्ये सर्वांना लागू झाला पण पुणे महापालिका कर्मचाºयांना नाही़ यामुळे पुणे महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये मोठा असंतोष असल्याचे सांगून घाटे यांनी, कोरोना काळात जीवाची बाजी लावून काम करणाºया या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोग लागू करण्याबाबत, पक्षनेत्यांची तातडीने बैठक घ्यावी व तो ठराव मंजूर करावा व शासनाकडे पाठवावा अशी मागणी केली़