वीज ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:11 AM2021-09-03T04:11:22+5:302021-09-03T04:11:22+5:30
जेजुरी : वीज ग्राहकांच्या विजेसंदर्भातील तक्रारी सोडविण्यासाठी वीज वितरणचे कार्यालय जेजुरी शहरात पूर्ववत करावे, तसेच ग्राहकांच्या विविध अडचणीचे ...
जेजुरी : वीज ग्राहकांच्या विजेसंदर्भातील तक्रारी सोडविण्यासाठी वीज वितरणचे कार्यालय जेजुरी शहरात पूर्ववत करावे, तसेच ग्राहकांच्या विविध अडचणीचे निराकरण करण्याची मागणी अखिल भारतीय मराठा महासंघ शाखा जेजुरीच्या वतीने जेजुरी वीज वितरण शाखेत निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षांपासून वीज मंडळाचे कार्यालय जेजुरी एमआयडीसी येथे नेल्याने जेजुरीतील वीज ग्राहकांची गैरसोय झाली आहे. जेजुरीतून तीन किलोमीटर असणाऱ्या कार्यालयात ग्राहकांना पायपीट करावी लागत आहे. किंवा दोनशे रुपये खर्चून खासगी वाहनाने येथे जावे लागत आहे. हा नाहक आर्थिक भुर्दंड नागरिकांना सहन करावा लागत आहे. ग्राहकांची अडचण सोडविण्यासाठी वीज कार्यलय पूर्ववत जेजुरीत सुरू करावे, शहराच्या काही भागात वीज वारंवार जाते त्यामुळे अनेक दुकानदारांचे नुकसान होते, दुरुस्तीचे काम नियोजन करून गुरुवारी करावे, शहरातील अनेक भागात रस्त्यात विजेचे खांब आहेत एखादी घटना घडून विजेच्या तारा तुटल्यास जीवित हानी होऊ शकते यासाठी हे खांब रस्त्याच्या कडेला बसवावेत, शहरातील अनेक भागात भूमिगत लाईनचे काम झाले असून त्याठिकाणी डीपी बसवून वीज चालू करावी, वीज बिल प्रीपेड पध्द्तीने सुरू करावे, अशा मागण्या मराठा महासंघाच्या वतीने करण्यात आल्या आहेत.
जेजुरी शाखा मराठा महासंघाचे पदाधिकारी विशाल बारसुडे, अनिकेत हरपळे, बाळासाहेब काळे, नीलेश हरपळे, तुषार कुंभारकर, विवेक उबाळे, सुशांत बारसुडे, शुभम बारसुडे,प्रशांत पवार,केतन उबाळे,यांनी वीज मंडळात निवेदन देऊन मागणी केली आहे.
--
०२जेजुरी वीज ग्राहक
फोटो ओळी : जेजुरी येथील वीज ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्याबाबत निवेदन देताना मराठा महासंघाचे कार्यकर्ते.
020921\img-20210831-wa0076.jpg
वीज ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करावे