लाडक्या बाबांप्रति व्यक्त केला आदर

By admin | Published: June 20, 2016 12:48 AM2016-06-20T00:48:29+5:302016-06-20T00:48:29+5:30

‘तो एक बाप असतो. डोक्यावर ऊन झेलत सावली तो देत असतो. दणदणत्या पावसापासून, कुटुंब आपलं जपत असतो. घर नीट चालण्यासाठी स्वत: बाहेर फिरत असतो.

Respect for the dear Baba | लाडक्या बाबांप्रति व्यक्त केला आदर

लाडक्या बाबांप्रति व्यक्त केला आदर

Next

पिंपरी : ‘तो एक बाप असतो. डोक्यावर ऊन झेलत सावली तो देत असतो. दणदणत्या पावसापासून, कुटुंब आपलं जपत असतो. घर नीट चालण्यासाठी स्वत: बाहेर फिरत असतो. आईच्या मऊशार तळव्यामागचा तोच राकट हात असतो,’ अशा प्रकारच्या संदेशाचे आदानप्रदान करीत रविवारी जागतिक पितृ दिवस (फादर्स डे) सोशल मीडियावर उत्साहात साजरा केला गेला.
वडिलांप्रति आदर व्यक्त करीत फादर्स डे उत्साहात साजरा झाला. सोशल मीडियावर वडिलांसोबतचे छायाचित्र आणि आठवणींचे लिखाण लोड करीत तरुणाईने वडिलांप्रति कृतज्ञता, स्रेह वृद्धिंगत केला.
जागतिक फादर्स डे जून महिन्यातील तिसऱ्या रविवारी जगभरात साजरा केला जातो. पाल्यांच्या पालनपोषणात आईसोबतच वडिलांचा वाटा तितक्यातच महत्त्वाचा आहे. जीवनभर काबाडकष्ट करीत कुटुंब जपत असतो. मुला-बाळांना काही कमी पडू नये म्हणून आपल्या आवडी आणि छंद बाजूला ठेवून त्यांना हवे ते साहित्य उपलब्ध करून देतो. परिस्थिती नसतानाही शिक्षण, नोकरी, व्यवसाय आदीसाठी आर्थिक तडजोड करीत साहाय्य करतो. आईच्या प्रेमासोबत वडिलांची कणखर पाठिंबा मुलांना प्रोत्साहन देणारा आणि आत्मविश्वास वाढविणार असतो.
बाबा, दादा, अण्णा, आप्पा, पप्पा, डॅडी या नावाने वडिलांना हाक मारली जाते. सहकुटुंब जेवणाचा आनंद घेत काही कुटुंबांनी आजचा दिवस साजरा केला. काहींनी वडिलांना भेटवस्तू देत कृतज्ञता व्यक्त केली. वटपौर्णिमा आणि फादर्स डे एकाच दिवशी रविवारी आल्याने त्यात सुटी असल्याने कुटुंबातील सदस्यांनी आनंदात दिवस घालविला. कुटुंबांतील सदस्यांनी वडीलधारी मंडळींना शुभेच्छा दिल्या.
व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम असा सोशल मीडियावर आपल्या वडील आणि त्यांच्यासोबतचे छायाचित्रे मोठ्या प्रमाणात पोस्ट केले गेले. वडिलांसोबतच्या आठवणी शेअर केल्या गेल्या. त्यास असंख्य लाइक्स मिळाले. बाबांना दीर्घायुष्य लाभो, असे ही संदेश छायाचित्रासह सोशल मीडियावर फिरत होते. सकाळी सुरू झालेला हा सिलसिला रात्री उशिरापर्यंत कायम होता. निधन झालेल्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण करीत काहींनी त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव केला. काहींनी संपूर्ण कुटुंबाचे छायाचित्र पोस्ट करीत कुटुुंबाचा आधारस्तंभ अशी उपमा देत कुटुंबप्रमुख बाबांप्रति आदर व्यक्त केला. (प्रतिनिधी)

Web Title: Respect for the dear Baba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.