कर्तबगार सखींचा सन्मान

By admin | Published: November 26, 2015 12:40 AM2015-11-26T00:40:58+5:302015-11-26T00:40:58+5:30

राजकारणापासून समाजकारणापर्यंत सर्व क्षेत्रांमध्ये स्त्रीने आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. ‘चूल आणि मूल’ या आयुष्याच्या पारंपरिक चौकटीला छेद देत

Respect for the hard work | कर्तबगार सखींचा सन्मान

कर्तबगार सखींचा सन्मान

Next

पुणे : राजकारणापासून समाजकारणापर्यंत सर्व क्षेत्रांमध्ये स्त्रीने आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. ‘चूल आणि मूल’ या आयुष्याच्या पारंपरिक चौकटीला छेद देत तिने यशाची शिखरे पादाक्रांत केली आहेत. आपल्या कर्तबगारीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या सखींना ‘लोकमत’च्या वतीने ‘सखी सन्मान पुरस्कार’ देऊन मानाचा मुजरा करण्यात आला.
‘लोकमत’तर्फे आयोजित वूमन समिटमध्ये या कौतुक सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रसिद्ध लेखक चेतन भगत, ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी, ‘लोकमत’चे चेअरमन विजय दर्डा, ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर यावेळी उपस्थित होते.
जिवाचे रान करून घर आणि दार सांभाळणाऱ्या महिलांच्या कष्ट उपसण्याची जिद्दीला, चिकाटीला आणि कर्तबगारीला सलाम करण्यासाठी ^लोकमतच्या वतीने हा पुरस्कार बहाल करण्यात येतो. निष्ठेने आणि निरपेक्षपणे काम करणा-या महिलांचे कार्य उजेडात येऊन उत्तम कार्याचा गौरव व्हावा, हा यामागचा हेतू आहे.
या परिषदेमध्ये सामाजिक, क्रीडा, शौर्य, शिक्षण, उद्योग व व्यवसाय, कला व साहित्य, आरोग्य या क्षेत्रातील कर्तबगार स्त्रियांना पुरस्कृत करण्यात आले. यंदाच्या वर्षी क्रीडा क्षेत्रासाठी रायफल शूटिंगमध्ये अग्रेसर असलेल्या पूजा घाटकर, सामाजिक क्षेत्रासाठी ‘खेळघर’च्या शुभदा जोशी, शौर्य विभागासाठी अन्नधान्य वितरण अधिकारी नीलिमा धायगुडे, शिक्षण क्षेत्रात रजनी परांजपे, उद्योग व व्यवसाय क्षेत्रात शुभांगी गोळे, कला आणि साहित्य क्षेत्रासाठी पर्ण पेठे, आरोग्य क्षेत्रात डॉ. वैशाली जाधव यांना ‘लोकमत सखी सन्मान २०१५’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याचबरोबर कामगार चळवळीत तळमळीने उभ्या राहणाऱ्या मुक्ता मनोहर यांना ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. टाळयांच्या कडकडाटात सभागृहाने त्यांच्या कर्तृत्वाला सलाम केला.
महिला सक्षमीकरणाच्या बळकटीसाठी परिसंवाद आणि हे सक्षमीकरण सिद्ध करणाऱ्या सखी, असा ‘दुग्धशर्करा’ योग या पुरस्कारांच्या निमित्ताने पहायला मिळाला. या पुरस्कारार्थी म्हणजे आमच्यासाठी ‘आयडॉल’ आहेत आणि त्यांचे कार्य, कामगिरी जाणून आम्हाला प्रोत्साहन मिळाने, अशी भावना अनेक तरुणी, महिलांनी
व्यक्त केली. (प्रतिनिधी)

Web Title: Respect for the hard work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.