नारीचा सन्मान हीच भारतीय संस्कृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:13 AM2021-03-09T04:13:59+5:302021-03-09T04:13:59+5:30
जागतिक महिला दिनानिमित्त जेजुरीत जयमल्हार ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने महिला दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी महाडिक बोलत होते. ...
जागतिक महिला दिनानिमित्त जेजुरीत जयमल्हार ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने महिला दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी महाडिक बोलत होते. .
महाडिक म्हणाले, जेथे महिलाना अपमानास्पद वागणूक दिली जाते तो समाज, ते कुटुंब, कधीच पुढे जाऊ शकत नाही. महिलांना संधी द्या, त्यांना बंधने घालू नका, त्यांच्यावरील अत्याचारविरुद्ध आवाज उठवला पाहिजे असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.
पुणे ससूनचे अधिव्याख्याते डॉ. रमेश भोसले यांनी महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. यावेळी नगराध्यक्षा वीणा सोनवणे अमृता घोणे आदींची भाषणे झाली.
कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने महिला दिनाच्या निमित्ताने नगराध्यक्षा वीणा सोनवणे, साधना दीडभाई, डॉ. शमा केंजळे, अमृता घोणे रुख्मिनी जगताप तसेच कोरोना काळात उल्लेखनीय कार्याबद्दल महिला आरोग्य सेविका, महिला पोलीस कर्मचारी, यांचा ही सन्मान करण्यात आला.
यावेळी रांगोळी स्पर्धेचे आयोजन ही केले होते. विजेत्यांना गौरव चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रशांत दरेकर, देवसंस्थान चे विश्वस्त संदीप जगताप, ज्ञानेश्वर भोईटे गुरुजी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रमेश देशपांडे, पदाधिकारी सुहास बारभाई, हरिश्चंद्र पोटे, शोभा दीडभाई, चंद्रकांत भोसले, अनंत जगताप, अशोक घोणे आदिंनी केले होते.