जिल्हाभरात स्वच्छता मोहिमेस प्रतिसाद
By Admin | Published: November 14, 2014 12:03 AM2014-11-14T00:03:06+5:302014-11-14T00:03:06+5:30
‘स्वच्छ भारत, निर्मल भारत’ अभियानांतर्गत स्वच्छतेची शपथ घेऊन जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये स्वच्छतेला प्रारंभ करण्यात आला.
‘स्वच्छ भारत, निर्मल भारत’ अभियानांतर्गत स्वच्छतेची शपथ घेऊन जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये स्वच्छतेला प्रारंभ करण्यात आला. अंगणवाडी सेविकांनी हातामध्ये झाडू घेऊन गावामधून स्वच्छता मोहीम राबविली. या मोहिमेत शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थही सहभागी झाले.
आंबेठाण : ‘स्वच्छ गाव, सुंदर गाव’ संकल्पना राबवून स्वच्छतेची चळवळ गावपातळीपासून राबवून तिचे स्वरूप अधिक व्यापक करावे आणि महात्मा गांधींनी ज्या स्वच्छ आणि समृद्ध भारताचे स्वप्न पाहिले, ते पूर्ण करणो आपले आद्य कर्तव्य आहे, असे प्रतिपादन सावरदरीचे सरपंच सतीश शेटे यांनी व्यक्त केले.
सावरदरी येथे ‘स्वच्छ भारत, निर्मल भारत’ अभियानांतर्गत स्वच्छतेची शपथ घेऊन गावाच्या स्वच्छतेला प्रारंभ करण्यात आला. ग्रामपंचायत कार्यालय परिसर, जिल्हा परिषद शाळा परिसर, तसेच मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आला. या प्रसंगी वैयक्तिक स्वच्छता, पिण्याचे पाणी, स्वच्छ शाळा, लहान मुलांचे आरोग्य, अंगणवाडी परिसर, आहार साठवणूक याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या मोहिमेत सावरदरीचे सरपंच सतीश शेटे, उपसरपंच कल्पना बाळासाहेब शेटे, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब पवार, ग्रामसेवक एस. जी. धोत्ने, माजी उपसरपंच रवी गाढवे, मारुती मेगळे, बाबूराव शेटे, पांडे गुरुजी यांच्यासह ग्रामस्थ व विद्यार्थी सहभागी झाले.
पाईट : पाईट बिटमधील 12 गावांमधील 26 अंगणवाडी सेविकांनी हातामध्ये झाडू घेऊन गावामधून स्वच्छता मोहीम राबविली. स्वच्छता मोहिमेची सुरुवात गावातील ग्रामदैवत श्री नवखंडेनाथ मंदिरापासून केली. दरम्यान, स्वच्छता मोहीम सुरू असताना पंचायत समितीचे सभापती सुरेश शिंदे यांनीही हातात झाडू घेऊन स्वच्छता मोहिमेत भाग घेतला. या वेळी पाईट, रौंधळवाडी, आहिरे, पराळे, कोये, धामणो, किवळे, कुरकुंडी, आसखेड बुद्रुक, चांदूस येथील सर्व अंगणवाडी सेविका स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झाल्या होत्या. यापुढे प्रत्येक 11 तारखेला बीटमधील सर्वच गावांत स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असल्याचे पर्यवेक्षिका शारदा बुट्टे यांनी या वेळी सांगितले.
आंबेठाण : ‘स्वच्छ गाव, सुंदर गाव’ संकल्पना राबवून स्वच्छतेची चळवळ गावपातळीपासून राबवून तिचे स्वरूप अधिक व्यापक करावे आणि महात्मा गांधींनी ज्या स्वच्छ
आणि समृद्ध भारताचे स्वप्न पाहिले, ते पूर्ण करणो आपले आद्य कर्तव्य
आहे, असे प्रतिपादन
सावरदरीचे सरपंच सतीश शेटे यांनी व्यक्त केले.
सावरदरी येथे ‘स्वच्छ भारत, निर्मल भारत’ अभियानांतर्गत स्वच्छतेची शपथ घेऊन गावाच्या स्वच्छतेला प्रारंभ करण्यात
आला. ग्रामपंचायत कार्यालय परिसर, जिल्हा परिषद शाळा परिसर, तसेच मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आला.
या प्रसंगी वैयक्तिक स्वच्छता, पिण्याचे पाणी, स्वच्छ शाळा, लहान मुलांचे आरोग्य,
अंगणवाडी परिसर, आहार साठवणूक याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
या मोहिमेत सावरदरीचे सरपंच सतीश शेटे, उपसरपंच कल्पना बाळासाहेब शेटे, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब पवार, ग्रामसेवक एस. जी. धोत्ने, माजी
उपसरपंच रवी गाढवे, मारुती मेगळे, बाबूराव शेटे, पांडे गुरुजी यांच्यासह ग्रामस्थ व विद्यार्थी सहभागी झाले. या उपक्रमाला सर्वाचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. (वार्ताहर)
नारायणपूर : स्वच्छ भारत अभियानांतर्गत कोडीत (ता. पुरंदर) येथील कृषी औद्योगिक विद्यालयात स्वच्छतेविषयीची शपथ देण्यात आली. या शाळेचे उपशिक्षक बी. डी. गायकवाड यांनी शाळेतील सर्व विद्याथ्र्याना शपथ दिली.
या वेळी श्रीनाथ शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष भय्यासाहेब खैरे, स्व. एकनाथकाका जगताप प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष जगताप, रोटरीच्या मीना घळसाशी, राम कुतवळ, सुवर्णा कुतवळ, धनंजय हिरवे, कलेश नेरुरकर, पल्लवी नेरुरकर, मारुती जाधव, विभाकर रामर्तीथकर, तुषार पाटील, मुख्याध्यापक पंढरीनाथ कोलते, बडदे सर, पडवळ सर, गणोश बडदे, योगेश बडदे, सुभाष बडदे, अण्णा खैरे, नंदकुमार बडदे, सत्यवान बाठे, संदीप कदम आणि विद्यार्थी उपस्थित होते.
या वेळी डेंग्यूच्या साथीबाबत घ्यायची खबरदारी, याविषयी जनजागृती केली. शौचालयाचा वापर केलाच पाहिजे, याबाबत जनजागृती करण्यात आली.
आपल्या घराचा परिसर स्वच्छ, सुंदर ठेवला पाहिजे आणि दुस:यांनाही याबाबत सांगितले
पाहिजे. हा संदेश घरोघरी पोहोचविण्याचा निर्धार या वेळी सर्व विद्याथ्र्यानी केला. (वार्ताहर)
खोडद : स्वच्छतेवर आधारित कार्यक्रमाला बळकटी मिळण्यासाठी देशाच्या स्वच्छ भारत अभियानात सर्वानीच आपापल्या पातळीवर सहभाग घ्या, असे आवाहन करून जिल्हा परिषद सदस्य माऊलीशेठ खंडागळे यांनी मांजरवाडी गावात स्वत: हातात झाडू घेऊन परिसर व गाव स्वच्छ केले.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत आठवडय़ातून किमान दोन तास श्रमदानातून स्वच्छता करावी, या प्रधाननंत्नी मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन जिल्हा परिषद सदस्य माऊली खंडागळे यांनीही गावातून या अभियानात सहभाग घेतला.
या वेळी श्रीमती लोहकरे, अंगणवाडी पर्यवेक्षिका सुरेखा गायकवाड, उपसरपंच संतोष मोरे, ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत थोरात, सुरेश थोरात, देवराम खंडागळे, भारती मुळे, ग्रामसेवक एस. एन. बनकर, सामाजिक कार्यकर्ते जयसिंग थोरात, डी. आर. थोरात, मुरलीधर भोर, अमृत पटवा, पी. पी. मुळे, ललिता मुळे, सर्व महिला बचत गटातील महिला, ग्रामस्थ, ग्रामपंचायत कमर्चारी या उपक्रमात सहभागी झाले होते.
या वेळी मांजरवाडी गावठाण व खोडद बाह्यवळण रस्ता, पालखी मार्ग, सुतारवाडा, ग्रामपंचायत परिसर व इंदिरानगर परिसर स्वच्छ करण्यात आला.
सासवड : स्वछ भारत अभियानाअंतर्गत पुरंदर तालुक्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजना वतीने नऊ ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
तालुक्यातील दिवे, गराडे, जवलार्जुन, परिंचे, वाघापूर, नायगाव, दौंडज, निलुंज, पिपर या ठिकाणी त्या भागातील सर्व अंगणवाडी सेविका एकत्न येऊन स्वच्छता मोहीम राबविण्यात आली व त्यातून स्थानिक लोकांमध्ये स्वच्छतेविषयी जागृती निर्माण केली.
वाघापूर येथे तालुक्याच्या सभापती गौरीताई कुंजीर, संपर्क अधिकार डॉ. विधाते, बाल विकास प्रकल्पाधिकारी मीरा टेकवडे, डॉ. काळे, पर्यवेक्षिका संजना शिंदे यांनी अभियानात भाग घेतला.
प्रत्येक महिन्याच्या 1क् तारखेला अशा प्रकारे बीट सभा आयोजित करून त्या ठिकाणी एकात्मिक बाल विकास योजनेची यंत्नणा स्वच्छतेसाठी श्रमदान करणार आहे.