देऊळगावगाडा येथे बालआनंद मेळाव्यास प्रतिसाद
By admin | Published: April 25, 2016 02:03 AM2016-04-25T02:03:55+5:302016-04-25T02:03:55+5:30
देऊळगावगाडा (ता. दौंड) येथील आयएसओ मानांकित जिल्हा प्राथमिक शाळेमध्ये बालआनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
खोर : देऊळगावगाडा (ता. दौंड) येथील आयएसओ मानांकित जिल्हा प्राथमिक शाळेमध्ये बालआनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये विद्यार्थी बाजार, विज्ञान प्रदर्शन, ज्ञानरचनावादी शैक्षणिक साहित्य हे उपक्रम हाती घेण्यात आले होते.
या वेळी विद्यार्थ्यांच्या पालकांनी या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांना बाजारहटासाठी लागणारी तरकारीची खरेदी पालकांनी करून दिली होती. यामध्ये कांदा, बटाटे, लिंबू, टोमॅटो, शेंगा, पालेभाज्या, उन्हाळ्याच्या कालावधीमधील थंडगार शीतपेय यांचा समावेश होता. दौंड तालुक्यामधील प्राथमिक सध्या ज्ञानरचनावादाच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांची शाळेविषयीची आवड निर्माण होऊन त्यांचे ज्ञान निश्चितच अवगत होईल. देऊळगावगाडा येथील प्राथमिक शाळेमध्येदेखील या ज्ञानरचना वादाचे धडे गिरविले जात आहेत. या बालआनंद मेळावा कार्यक्रमाप्रसंगी सरपंच ज्योती जामकर, उपसरपंच संगीता शितोळे, डी. डी. बारवकर उपस्थित होते.