प्राचिन युध्द कला स्पर्धेला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:11 AM2021-04-04T04:11:23+5:302021-04-04T04:11:23+5:30

पुणे येथील प्राचीन युद्ध कला संघाच्या वतीने पाटस येथील विश्वशांती बुध्द विहारातील गौतम बुद्ध आणि डॉ. ...

Response to the ancient martial arts competition | प्राचिन युध्द कला स्पर्धेला प्रतिसाद

प्राचिन युध्द कला स्पर्धेला प्रतिसाद

Next

पुणे येथील प्राचीन युद्ध कला संघाच्या वतीने पाटस येथील विश्वशांती बुध्द विहारातील गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. . या स्पर्धेत अजय तिरेकर, विहान वैद्य, वैष्णवी चव्हाण, शार्दूल लाड, वीर बंदिष्टी या विद्यार्थ्यांनी बेस्ट परफॉर्मन्स चा पुरस्कार पटकावला. उपस्थित मान्यवरांचे हस्ते विजेतांना पुरस्काराचे प्रमाणपञ देण्यात आले.

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर पार पडलेल्या या स्पर्धेसाठी शासनाच्या नियमांचे पालन करण्यात आले होते. सर्व विजेत्या स्पर्धकांचा सन्मान पाटस ग्रामपंचायतचे उपसरपंच छगन म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल भागवत, चंद्रकांत भागवत, डॉ धवल वैद्य, नितीन वाबळे, पृथ्वीराज ओव्हाळ, कल्पना पाटणकर आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धांचे आयोजन प्रदीप शिवपुंजे यांनी केले होते.

--

फोटो क्रमांक : ०३ पाटस युध्दकला

फोटो ओळी : पाटस ( ता. दौंड ) येथील युध्द स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी

Web Title: Response to the ancient martial arts competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.