फेरफार अदालतीला शिरूर तालुक्यात प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:11 AM2021-02-11T04:11:42+5:302021-02-11T04:11:42+5:30
महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी तालुक्यामधील मंडल अधिकारी स्तरावर ही अदालत घेण्यात येते. त्या मंडलामधील गावातील शेतकऱ्यांचे जमिनीच्या नोंदीबाबतची जुनी व ...
महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी तालुक्यामधील मंडल अधिकारी स्तरावर ही अदालत घेण्यात येते. त्या मंडलामधील गावातील शेतकऱ्यांचे जमिनीच्या नोंदीबाबतची जुनी व नवीन अर्ज, खरेदी विक्री वाटणीपत्र यांच्या नोंदी तत्काळ त्यांच ठिकाणी मंजूर करण्यात येणार आहे . त्यासाठी शेतकऱ्यांनी आवश्यक ती कागदपत्रे दाखवून नोंदी करून घ्याव्यात, असे आवाहन तहसीलदार लैला शेख यांनी केले आहे . टाकळी हाजी येथे मंडलाधिकारी एकनाथ ढाके, मंडलाधिकारी तीर्थ गिरीगोसावी, तलाठी एस. आय. कमलीवाले, तलाठी रवींद्र सरोदे, अमोल थिगळे, तलाठी गोविंद घोडके, ग्रामविकास अधिकारी राजेश खराडे, डॉ. संभाजी घोडे, डॉक्टर संपत सोदक, मकरंद साबळे, दत्तात्रय पवार यांच्यासह मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते. येथे शेतकऱ्यांना ७/१२ वाटप करण्यात आले. रांजणगाव गणपती येथे तहसीलदार लैला शेख यांनी उपस्थित राहत नोंदीच्या प्रकरणे मार्गी लावली. या वेळी मंडल अधिकारी संतोष नलावडे, तलाठी सुशीला गायकवाड उपस्थित होते .
रांजणगाव गणपती ता. शिरूर येथे फेरफार अदालतीमध्ये उपस्थित तहसीलदार लैला शेख व अधिकारी.