प्रेम भावनेचा प्रतिसाद म्हणजे कविता : संदीप खरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:09 AM2021-02-15T04:09:53+5:302021-02-15T04:09:53+5:30

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे व्हॅलेंटाईन्स डे निमित्ताने रविवारी (दि.१४) ज्येष्ठ कवी आणि गझलकार म. भा. चव्हाण यांच्या हस्ते जना-मनात ...

The response to the feeling of love is poetry: Sandeep Khare | प्रेम भावनेचा प्रतिसाद म्हणजे कविता : संदीप खरे

प्रेम भावनेचा प्रतिसाद म्हणजे कविता : संदीप खरे

Next

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे व्हॅलेंटाईन्स डे निमित्ताने रविवारी (दि.१४) ज्येष्ठ कवी आणि गझलकार म. भा. चव्हाण यांच्या हस्ते जना-मनात कवितेच्या माध्यमातून प्रेम भावना रुजविणारे कवी संदीप खरे यांना ‘सर्वोत्कृष्ट प्रेमकवी’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, त्या वेळी पुरस्काराला उत्तर देताना खरे बोलत होते.

यावेळी रंगत-संगत प्रतिष्ठानचे संस्थापक अॅड.प्रमोद आडकर, रंगत-संगत प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा मैथिली आडकर आणि रंगत-संगत प्रतिष्ठानच्या काव्य विभागाच्या समन्वयक शिल्पा देशपांडे उपस्थित होत्या.

संदीप खरे म्हणाले, प्रेम ही भावना अतिशय तरल आहे. प्रेम ही केंद्रीय संकल्पना ठेवून काव्य निर्मिती करतांना शब्द हात जोडून समोर उभे असतात.

म. भा. चव्हाण म्हणाले, आयुष्यावर बोलू काही म्हणता म्हणता नवीन पिढीला कवितेवरही बोलायला लावणारा संवेदनशील कवी, गायक म्हणून संदीप खरे यांचा उल्लेख करता येईल. संदीप खरे यांनी मधाळ आणि सोप्या शब्दांनी प्रेम कवितांना नवा आयाम दिला. जड, अवघड, अलंकारयुक्त शब्दांशिवाय कविता सुंदर, साधी, सोपी होऊ शकते, हे खरे यांनी दाखवून दिले. कवितांमध्ये अधिकाधिक गेयता आणून त्याच्या सादरीकरणाचा दर्जा देखील खरे यांनी वाढविला.

शिल्पा देशपांडे यांनी संदीप खरे यांना देण्यात आलेल्या सन्मानपत्राचे वाचन केले.

अॅड.प्रमोद आडकर यांनी प्रास्ताविक केले, तर मैथिली आडकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Web Title: The response to the feeling of love is poetry: Sandeep Khare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.