कैद्यांसाठी आरोग्य शिबिराला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:12 AM2020-12-24T04:12:44+5:302020-12-24T04:12:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ʻलोकमतʼ आणि डिवाईन जैन ग्रुप ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ʻलोकमतʼ आणि डिवाईन जैन ग्रुप ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे त्वचा रोग चिकित्सा शिबिर घेण्यात आले. यावेळी सुमारे ११०० कैद्यांची तपासणी करुन त्यांना औषधे देण्यात आली.
या शिबिरासाठी बी. जे मेडीकल कॉलेज व ससुन सर्वोपचार रुग्णालय येथील प्राध्यापक डॉ. आर बी चव्हाण व स्किन क्लिनिक ३६०चे डॉ. रशमी गुजलवार आणि त्यांच्या
टीमने सहकार्य केले. यावेळी कारागृह अधीक्षक यु टी पवार म्हणाले, ‘लोकमत’ समूहाने कैद्यासाठी केलेले हे कार्य कौतुकास्पद आहे.कोरोना काळात देखील कैद्यांना कोरोनाची बाधा होऊ नये यासाठी आम्ही सर्व कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली. सुमारे सहा हजार कैद्यांना सुरक्षित ठेवले. कैद्यांना त्वचेचे रोग जास्त प्रमाणात होतात. त्यामुळे या कार्यक्रमामुळे अनेक कैद्यांना याचा लाभ होणार आहे.यावेळी वरिष्ठ तुरूंग अधिकारी
प्रदीप जगताप व कारागृहातील इतर अधिकारी, डिवाईन जैन ग्रुपचे अध्यक्ष संकेत शहा आदी उपस्थित होते.
..........
फोटो आहे