प्लाझ्मादान शिबिराला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:04 AM2021-05-04T04:04:29+5:302021-05-04T04:04:29+5:30
प्लाझ्मादान शिबिराची सुरुवात येथील रोटरी ब्लड बँकेत धन्वंतरी देवतेची पूजा करून करण्यात आली. पहिल्या दिवशीच ...
प्लाझ्मादान शिबिराची सुरुवात येथील रोटरी ब्लड बँकेत धन्वंतरी देवतेची पूजा करून करण्यात आली. पहिल्या दिवशीच साधारणतः अकरा प्लाझ्मा दान झाले. दरम्यान, सामाजिक बांधिलकीतून प्लाझ्मा दान करण्यास कोविड योद्ध्यांनी पुढे यावे आणि या चळवळीस सहकार्य करावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. प्लाझ्मादानाने कोरोना रुग्णांचे प्राण वाचविण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे सामाजिक ही माणुसकीची भावना ठेवून कोरोना होऊन गेलेल्यांनी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले.
या वेळी प्रवीण परदेशी, समीर राजोपाध्ये, स्वाती राऊत, प्रफुल्ल बोडखे, अनिकेत वैद्य, वैजनाथ जाधव, निखिल शिंदे, जयेश ओसवाल, आनंद गटणे, संतोष पळसे, संतोष जगताप, पराग पवार, श्यामसुंदर सोनोने, कुणाल मंत्री, राहुल निमजे, संगीत बलदोटा, धनंजय वाडेकर, तुषार अरगनुर, राहुल जाधव, गौरव साळुंखे यांनी सहकार्य केले.
--