‘आयएमईडी’च्या मेळाव्यास विद्यार्थ्यांकडून प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 04:10 AM2020-12-02T04:10:53+5:302020-12-02T04:10:53+5:30
पुणे : भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट (आयएमईडी)च्या वतीने आयोजित मेळाव्यास माजी विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत ...
पुणे : भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट (आयएमईडी)च्या वतीने आयोजित मेळाव्यास माजी विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे आयएमईडीचे संचालक आणि भारती विद्यापीठ व्यवस्थापनशास्त्र शाखेचे अधिष्ठाता डॉ. सचिन वेर्णेकर यांनी कळवले आहे.
आयएमईडीतर्फे ‘सहयोग २०२०’ या नावाने माजी विद्यार्थ्यांचे दोन मेळावे नुकतेचे घेण्यात आले. पहिल्या मेळाव्यात टीसीएसचे सहाय्यक व्यवस्थापक संदीप भन्साळी, एमडॉक्सचे रिजनल फॅसिलिटीज मॅनेजर सुजित एदलाबादकर, एमएसएम लॉजिस्टिक्सचे मार्केटिंग हेड मनोरंजन गामी या माजी विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केले. दुसऱ्या मेळाव्यात माजी विद्यार्थी आणि शाओमी टेक्नॉलॉजीचे मार्केटिंग मॅनेजर आशीष सिंग, सिप्ला इंडियाचे सिनियर ब्रँड मॅनेजर सुधांशू बेहरा यांनी मार्गदर्शन केले.