कळंबमध्ये टेस्ट व रक्तदान शिबिरास प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:18 AM2021-05-05T04:18:12+5:302021-05-05T04:18:12+5:30

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन माजी सभापती वसंतराव भालेराव यांचे हस्ते झाले. माजी सभापती उषाताई कानडे यांनी फीत ...

Response to test and blood donation camp in Kalamb | कळंबमध्ये टेस्ट व रक्तदान शिबिरास प्रतिसाद

कळंबमध्ये टेस्ट व रक्तदान शिबिरास प्रतिसाद

Next

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन माजी सभापती वसंतराव भालेराव यांचे हस्ते झाले. माजी सभापती उषाताई कानडे यांनी फीत कापून शिबिराचे उद्घाटन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच राजश्री भालेराव होत्या. या वेळी यशवंतराव कानडे, शिवाजी भालेराव, बाबूराव कानडे, बाळशिराम भालेराव, भरत कानडे, राजकुमार साळवे, मंगेश पाटील, सुरेखा भालेराव, सुनंदा भालेराव, ज्ञानेश्वर कानडे, इसाक शेख, बळीराम थोरात आदी उपस्थित होते.

कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी योगदान देणाऱ्या आशासेविका, अंगणवाडीसेविका, प्राथमिक शिक्षक, आरोग्यसेवक यांचा सन्मान करण्यात आला.

डॉ. बाळकृष्ण थोरात व डॉ. अमोल थोरात यांनी आरोग्य तपासणी केली. याचा लाभ १००हून अधिक नागरिकांनी घेतला. प्रयोगशाळा तंत्रज्ञ योगिता बोरसे, धर्मराज कोळी, रेश्मा हगवणे, सोपान घोग्रे, विश्वनाथ कारोट, सविता देठे, अंजना रोकडे, वर्षा निघोट, उषा भालेराव, सिंधुबाई चासकर यांनी अँटिजेन तपासणी व्यवस्था पाहिली. यापैकी आठ व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्या. मोरया ब्लड बँक, चिंचवड यांनी रक्तदान शिबिर व्यवस्था पाहिली. ६१ नागरिकांनी रक्तदानासाठी नोंदणी केली होती, त्यापैकी २५ व्यक्तींना रक्तदान करता आले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे, प्रा. दत्तात्रय भालेराव यांनी शिबिरास भेट दिली.

शिबिर यशस्वी होण्यासाठी नितीन भालेराव, संतोष कानडे, गणेश लोहोकरे, रोहनभाऊ कानडे, अजित भालेराव, सुजित भालेराव, अक्षय भालेराव, संतोष जठार, अभिषेक कानडे, संदेश भालेराव, अजित वर्पे, हर्षल भालेराव, सिद्धार्थ वर्पे, योगेश भालेराव, विवेक फसाले, नीलेश भालेराव, सिद्धेश कानडे, सागर पिंगळे यांनी परिश्रम घेतले. ज्ञानलक्ष्मी प्रतिष्ठानचे संस्थापक बाळासाहेब कानडे यांनी आभार मानले.

--

फोटो क्रमांक : ०४ मंचर कळंब शिबिर

मजकूर : कळंब येथे ग्रामपंचायतद्वारा मोफत आरोग्य व कोरोना निदान तपासणी तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले

Web Title: Response to test and blood donation camp in Kalamb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.