शिरूर शहरात कचरा डेपोवर उद्यानात हळदीकुंकवाचा कार्यक्रमाला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:18 AM2021-02-06T04:18:11+5:302021-02-06T04:18:11+5:30

शिरूर नगर परिषद महिला बालकल्याण समितीच्या वतीने हळदीकुंकवाच्या कार्यक्रमाचा प्रारंभ राजमाता जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन ...

Response to turmeric program in the park at the waste depot in Shirur city | शिरूर शहरात कचरा डेपोवर उद्यानात हळदीकुंकवाचा कार्यक्रमाला प्रतिसाद

शिरूर शहरात कचरा डेपोवर उद्यानात हळदीकुंकवाचा कार्यक्रमाला प्रतिसाद

Next

शिरूर नगर परिषद महिला बालकल्याण समितीच्या वतीने हळदीकुंकवाच्या कार्यक्रमाचा प्रारंभ राजमाता जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन आमदार अशोक पवार यांच्या सौभाग्यवती जिल्हा परिषद सदस्य सुजाता पवार यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी नगराध्यक्षा वैशाली वाखारे,महिला बालकल्याण समिती सभापती मनीषा कालेवार, उपसभापती संगीता मल्लाव, माजी नगराध्यक्ष उज्ज्वला बरमेचा, नगरसेविका सुरेखा शितोळे, रोहिणी बनकर, सुनीता कुरुंदळे, रेश्मा लोखंडे, ज्योती लोखंडे, अंजली थोरात, शिरुर नगर परिषद मुख्याधिकारी महेश रोकडे यासह माजी नगरसेविका व मोठ्या प्रमाणात शहरातील महिला भगिनी उपस्थित होते.

या वेळी जिल्हा परिषद सदस्य सुजाता पवार यांनी स्वच्छतेची व वसुंधरेची शपथ सर्व महिला भगिनींना दिली.

शिरूर नगर परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने काल दिनांक ३ फेबुवारी रोजी स्वच्छ सर्वेक्षणाअंतर्गत महिला ही कुंटुबातील केंद्रस्थानी असून महिलावर्गात स्वच्छतेचे महत्त्व रुजावे, जो कचरा घरातून नगर परिषदेच्या घंटागाडीद्वारे संकलित करुन त्याची विल्हेवाट कशा पद्धतीने लावण्यात येते. याची शास्त्रोक्त माहिती, ओला व सुका कचरा वेगवेगळ्या पद्धतीने कसा करावा याची परिपूर्ण माहिती महिलांना समजावे . यासाठी हळदीकुंकवाचा कार्यक्रम कचरा डेपोवर उभारण्यात आलेल्या स्वच्छता प्रेरणा उद्यानात ठेवण्यात आला होता. देशातील व राज्यातील हा पहिलाच उपक्रम आहे.

शिरूर नगर परिषदेचे सभागृह नेते प्रकाश धारिवाल यांच्या मार्गदर्शनाखाली, नगराध्यक्षा वैशाली वाखारे, मुख्याधिकारी महेश रोकडे व नगरसेवकांनी याबाबत नियोजन करून त्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे. महिला भगिनींसाठी ’वाण’ म्हणून जास्वंदाचे रोप, १ किलो सेंद्रिय खताची बॅग व १ पोळ्याचा डबा भेट देण्यात आला. महिला बालकल्याण समितीच्या सभापती मनीषा कालेवार यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन रोहिणी बनकर यांनी केले व आभार बांधकाम सभापती संगीता मल्लाव यांनी मानले.

शिरूर नगर परिषद महिला बालकल्याण समितीच्या वतीने हळदीकुंकवाच्या कार्यक्रमात दीपप्रज्वलन करताना

जिल्हा परिषद सदस्य सुजाता पवार व उपस्थित नगरसेविका.

Web Title: Response to turmeric program in the park at the waste depot in Shirur city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.