सहकारी सोसायट्यांवर निवडणुकीची जबाबदारी

By Admin | Published: January 22, 2017 05:00 AM2017-01-22T05:00:24+5:302017-01-22T05:00:24+5:30

लोकसभा, विधानसभा अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष व सचिवांना बूथ लेव्हल आॅफिसरची भूमिका पार पाडावी लागणार आहे.

Responsibility for elections on co-operative societies | सहकारी सोसायट्यांवर निवडणुकीची जबाबदारी

सहकारी सोसायट्यांवर निवडणुकीची जबाबदारी

googlenewsNext

पुणे : लोकसभा, विधानसभा अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष व सचिवांना बूथ लेव्हल आॅफिसरची भूमिका पार पाडावी लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर प्लेज टू व्होट’ या माध्यमातून सोमवारपासून (दि. २३) सहकार विभाग सहकारी सोसायट्यांमधून जागृती करणार आहे.
सरकारच्या अध्यादेशानुसार सार्वजनिक निवडणुकांमध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांना देखील भूमिका बजावावी लागणार आहे. संस्थेचा अध्यक्ष व सचिवाला बूथ लेव्हल आॅफिसरची भूमिका बजावावी लागेल. त्याचबरोबर सोसायटीतील मतदार यादी अद्ययावत करणे, जुनी नावे यादीतून काढून टाकणे अथवा नवीन नावांची भर घालणे याची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे.

- विविध सोसायट्यांमध्ये बैठका बोलावून त्याची माहिती देखील दिली जाणार आहे. सोमवारपासून हडपसर व वानवडी येथून या उपक्रमाची सुरुवात होणार असल्याची माहिती प्लेज टू व्होटचे अ‍ॅड. राधिकेश उत्तरवार यांनी दिली.

Web Title: Responsibility for elections on co-operative societies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.