ढिसाळ आरोग्य व्यवस्थेची जबाबदारी प्रशासनावर : चलवादी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:10 AM2021-05-01T04:10:30+5:302021-05-01T04:10:30+5:30
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये सामान्य नागरिकांना वेळेत वैद्यकीय सेवा मिळू शकली नाही. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यासाठी ...
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये सामान्य नागरिकांना वेळेत वैद्यकीय सेवा मिळू शकली नाही. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
त्यासाठी मनपा कडील अनुभवी व कर्तव्यदक्ष सेवानिवृत्त डाॅक्टर व कर्मचारी यांचे मार्गदर्शन घ्यावे. रुग्णांना घरीच विलगीकरण कक्षात ठेवून औषधोपचार करून घरीच बरे करता येऊ शकते. तसेच सरकारी व पुणे मनपाच्या शाळेच्या व विविध संस्थेच्या इमारती व मंगल कार्यालयामध्ये विलगीकरण कक्ष सुरू करावेत. महापालिकेच्या वतीने गोरगरिब लोकांना वैद्यकीय सेवा, सिटी स्कॅन सेंटर, रक्त तपासणी सेंटर सुरू करावेत. शहरी गरीब योजनेमार्फत अल्प दरामध्ये विशेष बाब म्हणून सर्व सामान्य जनतेला आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देणे अपेक्षित होते. परंतु या काळात मोठ्या प्रमाणात शहरी गरीब योजना राबविणे गरजेचे असतानाही योजना पुढील काही महिन्यापर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. या योजनेच्या जाचक अटी रद्द करून सर्वांना याचा लाभ मिळवून द्यावा.