रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळावर जबाबदारीने काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:10 AM2020-12-22T04:10:16+5:302020-12-22T04:10:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गेल्या अनेक वर्षांपासून नाट्य क्षेत्रात काम करीत आहे. या क्षेत्राने खूप काही दिले. आता ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गेल्या अनेक वर्षांपासून नाट्य क्षेत्रात काम करीत आहे. या क्षेत्राने खूप काही दिले. आता मराठी रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळावर काम करण्याची संधी मिळाली आहे. हे काम खूप जबाबदारीचे आहे. ते प्रामाणिकपणे पार पाडण्याचा नक्की प्रयत्न करेन, असा विश्वास रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे नवनिर्वाचित सदस्य दीपक रेगे यांनी सोमवारी व्यक्त केला.
निळू फुले कला अकादमीच्या वतीने रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाच्या सदस्यपदी रंगकर्मी दीपक रेगे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा रंगकर्मी सिंधू काटे आणि निळू फुले यांच्या भगिनी प्रमिला ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. अकादमीचे सुरेश देशमुख आणि मनोरंजन चे मोहन कुलकर्णी यावेळी उपस्थित होते.
बालरंगभूमी परिषदेचे उदय लागू, एकपात्री कलाकार परिषदेच्या चैताली माजगावकर-भंडारी, प्रा.विकास देशपांडे, बालरंग भूमी परिषदेचे अध्यक्ष उदय लागू तसेच रंगभूमी सेवा संघ यांच्या वतीने रेगे यांचा सत्कार करण्यात आला.
आज या सत्कार सोहळ्याने खूप भारावून गेलो आहे, अशी भावना रेगे यांनी व्यक्त केली.
----------------------------------------------
निळू फुले कला मंदिर प्रायोगिक नाटकांसाठी मोफत देणार
आजही शहरातील विविध भागात नाटक पोहोचलेले नाही. त्यात कोरोना काळात नाटक चालेल असे वाटत नाही. त्यामुळे आठही मतदारसंघ आणि जिल्ह्यातील सर्व तालुक्यात नाटक पोहोचविण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. राष्ट्र सेवा दलाच्या साने गुरुजी स्मारकातील निळू फुले कला मंदिर हे प्रायोगिक नाटकासाठी मोफत देण्यात येणार आहे. तसेच, शहरातील नाटक आणि चित्रपटांची पुस्तके संकलित करून ती नाममात्र दरात लोकांना उपलब्ध करून देणार आहोत, अशी माहिती अकादमीचे सुरेश देशमुख यांनी दिली.
----------------------------------------------