कोरेगावा भीमात अभिवादनासाठी निर्बंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:12 AM2020-12-24T04:12:42+5:302020-12-24T04:12:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : करोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाच्या ठिकाणी येत्या १ ला जानेवारी होणा-या ...

Restrictions for greetings in Koregaon Bhima | कोरेगावा भीमात अभिवादनासाठी निर्बंध

कोरेगावा भीमात अभिवादनासाठी निर्बंध

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : करोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाच्या ठिकाणी येत्या १ ला जानेवारी होणा-या अभिवादन कार्यक्रमासाठी केवळ पास असणाऱ्यांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. अन्य नागरिकांना या ठिकाणी येण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. येथे कोणत्याही संस्था आणि संघटनांना फलक लावण्यासही मनाई करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत विविध संघटनांची बुधवारी (दि.२३) बैठक घेण्यात आली. या बैठकीला पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे, परशुराम वाडेकर आदी उपस्थित होते.

या बैठकीत कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली. त्यानुसार ३१ डिसेंबर रोजी रात्री बारा वाजता भिख्खू संघाच्या उपस्थित धम्म वंदना होणार आहे. एक जानेवारीला धम्मदेसना बुद्ध वंदना, समता सैनिक दलाचे संचलन, मान्यवरांकडून विजयस्तंभाला अभिवादन केले जाणार आहेत. एक जानेवारीला दुपारी बारा वाजेपर्यंत हे कार्यक्रम होणार आहेत. पास असणाऱ्यांनाच या ठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे. अन्य नागरिकांना निर्बंध असल्याचे डॉ. धेंडे आणि डंबाळे यांनी सांगितले. या परिसरात कोणत्याही संघटना आणि पक्षांना फलक लावण्यास मनाई असणार आहे’ असे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, राज्याच्या गृह विभागाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार या ठिकाणी नागरिकांना गर्दी करण्यावर निर्बंध घालण्यात आले असून, जाहीर सभा, खाद्यपदार्थ आणि पुस्तकांचे स्टॉल लावण्यास मनाई करण्यात आली आहे.

Web Title: Restrictions for greetings in Koregaon Bhima

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.