पुणे जिल्ह्यात बैलपाेळ्याला निर्बंध; मिरवणुक काढणे, बैल एकत्र आणण्यास बंदी
By ज्ञानेश्वर भोंडे | Published: September 23, 2022 04:12 PM2022-09-23T16:12:32+5:302022-09-23T16:13:53+5:30
येत्या रविवारी जिल्हयात भाद्रपदी बैलपाेळा साजरा केला जात आहे....
पुणे : राज्यासह जिल्हयात लम्पी राेगाचे सावट आहे. हा राेग संसर्गजन्य असून ताे बाधित जनावरे एकमेकांच्या संपर्कात आल्याने पसरताे. तर, येत्या रविवारी जिल्हयात भाद्रपदी बैलपाेळा साजरा केला जात आहे. बैलपाेळा घरच्या घरी साजरा करता येणार आहे. मात्र, बैल एकत्रित आणणे, गावात मिरवणुक काढणे यावर बंदी घालण्यात आली आहे. जर काेणी या नियमाचा भंग केल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डाॅ. शिवाजी विधाते यांनी दिली.
राज्यात लम्पीचा प्रसार राेखण्यासाठी राज्य शासनाने अधिसूचना जारी करत गुरांना एकत्र आणणे, त्यांची विक्री करणे, प्रवास करून इतर ठिकाणी घेउन जाणे, जिल्हा किंवा राज्याच्या सीमा ओलांडणे आदींवर बंदी घातली आहे. तसेच बैल बाजार भरवण्यासही बंदी घातली आहे. त्यानुसार १० सप्टेंबर राेजी पुणे जिल्हाधिका-यांनी देखील या अधिसुचनेनुसार पुणे जिल्हयात हे निर्बंध कायम केलेले आहेत.
पुणे जिल्हयात जिल्हाधिका-यांनी गुरांबाबतचे जारी केलेले निर्बंध कायम आहेत. त्यानुसार घरच्या घरी बैलपाेळा साजरा करावा. बैलांना एकत्र करणे, गावातून मिरवणुक काढणे यावर बंदी आहे. जर नियमांचा भंग केला तर संबंधितांवर गुन्हा दाखल हाेउ शकताे. त्या
- शिवाजी विधाते, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी