शहरातील १० रस्त्यांवर वाहतुकीचे निर्बंध, पर्यायी रस्त्यांचा वापर करण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 07:39 AM2017-08-29T07:39:18+5:302017-08-29T07:39:22+5:30
गणेशोत्सवानिमित्त शहरातील १० रस्त्यांवरील काही भागात वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले असून, नागरिकांनी पर्यायी रस्त्याचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
पुणे : गणेशोत्सवानिमित्त शहरातील १० रस्त्यांवरील काही भागात वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले असून, नागरिकांनी पर्यायी रस्त्याचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
लक्ष्मी रस्त्यावरील हमजेखान चौक ते टिळक चौक, शिवाजी रस्त्यावरील काकासाहेब गाडगीळ पुतळा ते जेधे चौक, बाजीराव रस्त्यावरील पूरम चौक ते
अप्पा बळवंत चौक, टिळक रस्त्यावरील मराठा चेंबर्स ते हिराबाग चौक अशा रस्त्यांवर सायंकाळनंतर वाहतुकीवर निर्बंध करण्यात आले असून पर्यायी रस्त्यांची माहिती त्या त्या भागात प्रदर्शित करण्यात आली आहे.
दिनकरराव जवळकर पथ ते पायगुडे चौक(जोशी आळी) हिराबाग चौक, अनंत नाईक पथ ते टिळक रोड अशा रस्त्यांवरही वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत.
गोटीराम भय्या चौक ते गोविंद हलवाई चौक, पानगंटी चौक ते गंज पेठ चौकी, नाईक हॉस्पिटल ते सुभानशा दर्गा आणि सोन्या मारुती चौक अशा
मार्गांवरही वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत.