निर्बंध हटले, कोरोनारुग्ण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:08 AM2021-06-18T04:08:55+5:302021-06-18T04:08:55+5:30

पुणे : कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आली म्हणून शहरातले निर्बंध शिथिल करण्यात आले. मात्र, सात हजारांच्या घरात होणाऱ्या कोरोना ...

Restrictions were lifted, coronary heart disease increased | निर्बंध हटले, कोरोनारुग्ण वाढले

निर्बंध हटले, कोरोनारुग्ण वाढले

Next

पुणे : कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आली म्हणून शहरातले निर्बंध शिथिल करण्यात आले. मात्र, सात हजारांच्या घरात होणाऱ्या कोरोना चाचण्या गेल्या दोन आठवड्यांत तीन-चार हजारांपर्यंत घसरले होते. या आठवड्यात ते पुन्हा पाच हजारांच्या पुढे गेले असून, रुग्णसंख्याही वाढताना दिसत आहे. रोजची रुग्णसंख्याही आस्ते-आस्ते वाढत तीनशेच्या घरात पोहोचू लागली आहे. त्यामुळे कोरोना साथीची संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी खबरदारी आवश्यक ठरू लागली आहे.

शहरात ११ जून रोजी ६ हजार ७६ तपासण्या झाल्या. त्यादिवशी केवळ २३९ कोरोनाबाधित आढळून आले. पण पुढे तपासण्यांचे प्रमाण दररोज हजाराने कमी होत गेले असूनही कोरोनाबाधितांचा आकडा हा सरासरी २६० राहिला आहे़

कोरोनाच्या पहिल्या लाटेत लॉकडाऊनमध्ये शिथिलता देताना, टप्प्याटप्प्याने सर्व व्यवहार पूर्ववत करण्यात आले. मात्र, या दुसऱ्या लाटेतून सावरताना दोनच टप्प्यांत सर्वच व्यवहार खुले झाल्याचे पाहण्यास मिळाले. त्यातच पावसाचे दिवस, जागोजागी अर्धवट असलेली रस्त्यांची कामे व गर्दी यामुळे सर्वत्र ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चा फज्जा उडाला आहे. ‘पीएमपीएमएल’ची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील, असे प्रशासनाने सांगितले. प्रत्यक्षात सर्वच प्रमुख मार्गावरील बस पूर्ण भरून ये-जा करत असल्याचे दिसत आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, खाणावळींमधली गर्दीही ५० टक्के क्षमतेच्या नियमाला हरताळ फासत असल्याचे आढळत आहे.

याचा परिणाम चिंताजनक असल्याने येत्या दोन-तीन आठवड्यांनंतर शहरातील घटलेली रुग्णसंख्या पुन्हा झपाट्याने वाढण्याची चिंता वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तविली आहे. जोपर्यंत शहरात ६० टक्क्यांच्यावर लसीकरण होत नाही, तोपर्यंत कोरोनाविरोधातील सामूहिक प्रतिकारशक्ती तयार होणार नसल्याचे तज्ज्ञ सांगतात.

Web Title: Restrictions were lifted, coronary heart disease increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.