ग्रामीण भागातही निर्बंध शिथिल होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:08 AM2021-06-11T04:08:53+5:302021-06-11T04:08:53+5:30
सुषमा नेहरकर-शिंदे पुणे : ग्रामीण भागातील ‘पाॅझिटिव्हिटी’ दर आता दहा टक्क्यांच्या खाली आला आहे. यामुळेच शहरी भागासोबतच आता ग्रामीण ...
सुषमा नेहरकर-शिंदे
पुणे : ग्रामीण भागातील ‘पाॅझिटिव्हिटी’ दर आता दहा टक्क्यांच्या खाली आला आहे. यामुळेच शहरी भागासोबतच आता ग्रामीण भागातील निर्बंधदेखील काही प्रमाणात शिथिल होणार आहेत. याबाबत शुक्रवारी (दि.११) पालकमंत्री अजित पवार यांच्या कोरोना आढावा बैठकीत चर्चा होऊन निर्णय घेतला जाणार असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
जिल्ह्यात पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड शहराचा ‘पाॅझिटिव्हिटी’ दर दहा टक्क्यांच्या खाली आल्याने या दोन्ही शहरातील ‘लाॅकडाऊन’मध्ये शिथिलता दिली आहे. परंतु ग्रामीण भागातील ‘पाॅझिटिव्हिटी’ दर दहा टक्क्यांपेक्षा अधिक असल्याने येथे अद्यापही कडक निर्बंध लागू आहेत.
राज्य शासनाने १ जूनपासून ‘अनलाॅक’ची प्रक्रिया सुरू केली. यासाठी पाच स्तर निश्चित केले असून यात त्या-त्या भागाचा ‘पाॅझिटिव्हिटी’ दर, ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यातील ग्रामीण भागाचा १३.४ टक्क्यांवरून ८.९ वर आला आहे. यामुळेच आता ग्रामीण भागातील निर्बंध शिथिल होण्याची शक्यता आहे.
चौकट
हे बदल अपेक्षित
-सर्व प्रकारची दुकाने दुपारी दुपारी ४ पर्यंत सुरू राहणार.
- माॅल, चित्रपटगृहे बंदच राहतील.
- हाॅटेल, रेस्टॉरंट, खाणावळी पन्नास टक्के क्षमतेने सुरू राहतील.
- लग्न-समारंभ ५० लोकांच्या उपस्थितीत करता येतील.