कोरोनाचा धोका कमी झाल्यास निर्बंध हळूहळू कमी केले जातील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:07 AM2021-07-03T04:07:55+5:302021-07-03T04:07:55+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनाच्या काळात नाटक, चित्रपटांचे प्रदर्शन बंद असल्याने कलाकारांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. हे ...

Restrictions will be gradually reduced if the risk of corona is reduced | कोरोनाचा धोका कमी झाल्यास निर्बंध हळूहळू कमी केले जातील

कोरोनाचा धोका कमी झाल्यास निर्बंध हळूहळू कमी केले जातील

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोनाच्या काळात नाटक, चित्रपटांचे प्रदर्शन बंद असल्याने कलाकारांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. हे मान्य आहे परंतु मध्यंतरी आपण निर्बंध कमी केले. त्यानंतर अचानक रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. लोकांचा जीव वाचला पाहिजे. लोकांचा जीव वाचवण्याला आपलं पहिले प्राधान्य आहे. त्यामुळे जसा धोका कमी होईल, तसे निर्बंध हळूहळू कमी केले जातील, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पडद्यामागील कलाकारांना दिले.

संवाद पुणे आणि आनंदी वास्तू यांच्या वतीने पुण्यातील पडद्यामागील २०० कलाकार-तंत्रज्ञांचा प्रत्येकी एक लाख रुपयांचा अपघात विमा उतरविण्यात आला असून या विमा प्रमाणपत्रांचे प्रातिनिधीक स्वरूपात वितरण आज (दि. २ जुलै) उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. संवाद पुणेचे सुनील महाजन, मराठी चित्रपट महामंडळाच्या संचालिका निकिता मोघे, आनंदी वास्तूचे आनंद पिंपळकर उपस्थित होते. दरम्यान, पडद्यामागील कलाकारांचा विमा उतरविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पाच लाख रुपये देण्याची घोषणाही पवार यांनी केली.

सुनील महाजन प्रास्ताविकात म्हणाले, ५० टक्के क्षमतेने नाट्यगृह खुली करण्यास परवानगी मिळावी, महापालिकेच्या नाट्यगृहांमध्ये नाट्य परिषदांना जागा मिळावी, कलावंतांसाठी असलेल्या वृद्धाश्रमाचा प्रश्न मार्गी लागावा.

कलाकारांच्या वतीने मागण्यांचे निवेदन सुरेंद्र गोखले आणि अरुण पोमण यांनी उपमुख्यमंत्री पवार यांना दिले. कलाकरांच्या वतीने गोखले यांनी समस्या मांडल्या. पवार यांचे स्वागत निकिता मोघे आणि आनंद पिंपळकर यांनी तर उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले.

----------------------------------

रंगभूमीवरील कलाकार आणि तंत्रज्ञांची संपूर्ण माहिती नसल्यामुळे शासनातर्फे मदत देण्यात अडचणी येतात. कलाकारांची अद्ययावत माहिती असणे आवश्यक आहे. गरजू कलाकारांना शासनातर्फे मदत देण्यासाठी केवळ मुंबई-पुण्याचा विचार करून उपयोग नाही तर चांद्यापासून बांद्यापर्यंत विखुरलेल्या कलाकारांचा एकत्रितपणे विचार करावा लागेल. कराच्या रूपातून मिळणाऱ्या पैशाचा विनियोग काळजीपूर्वक करणे आवश्यक असते. गरजूंना मदत करण्यासाठी शासनाची कर्ज काढण्याचीही तयारी आहे.

- अजित पवार, उपमुख्यमंत्री

Web Title: Restrictions will be gradually reduced if the risk of corona is reduced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.