पुरंदरमध्ये टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:08 AM2021-06-01T04:08:34+5:302021-06-01T04:08:34+5:30

पुरंदरमध्ये बाधितांचे प्रमाण २५ टक्के असल्याने पुरंदरमध्ये सध्या निर्बंध शिथिल होणार नाहीत. बाधितांचे प्रमाण कमी झाल्यावर टप्प्याटप्प्याने निर्बंध ...

Restrictions will be phased out in Purandar | पुरंदरमध्ये टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल होणार

पुरंदरमध्ये टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल होणार

Next

पुरंदरमध्ये बाधितांचे प्रमाण २५ टक्के असल्याने पुरंदरमध्ये सध्या निर्बंध शिथिल होणार नाहीत. बाधितांचे प्रमाण कमी झाल्यावर टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल केले जातील, अशी माहिती आमदार संजय जगताप यांनी दिली.

सोमवारी (दि. ३१) सासवड येथे कोरोनाबाबत सर्व शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत आ. जगताप यांनी माहिती दिली.

तालुक्यातील आत्तापर्यंत कोरोनाचे एकूण १४ हजार १६५ रुग्ण आढळले. त्यापैकी १३ हजार ६८ रुग्ण बरे होऊन घरी परतले, तर २५८ जणांचा मृत्यू झाला. सध्या ८३९ रुग्ण उपचार घेत असून, बरे होण्याचे प्रमाण ९२ टक्के असल्याचे आ. जगताप यांनी सांगितले. सासवड, जेजुरी या शहरी भागात संसर्ग आटोक्यात आहे, मात्र ग्रामीण भागात वाढल्याने निर्बंध शिथिल करता येणार नाही. या वेळी गटविकास अधिकारी अमर माने, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. किरण राऊत, सासवड न. प. चे मुख्याधिकारी विनोद जळक, जेजुरीच्या पूनम शिंदे, पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप, सुनील महाडिक आदी उपस्थित होते.

जेजुरी येथील आॅक्सिजन प्लँटमध्ये दररोज ९०० सिलिंडरची निर्मिती होत असल्याने आॅक्सिजनचा तुटवडा होणार नाही. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेप्रमाणे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून सासवड येथील तर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या सीएआर फंडातून जेजुरीच्या ग्रामीण रुग्णालयात आॅक्सिजन प्लँट उभारून आॅक्सिजनची स्वनिर्मित होणार असल्याने येथील आॅक्सिजन बेड्ससाठी याचा उपयोग होणार असल्याचे जगताप म्हणाले. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोना संसर्गाचा धोका असल्याचे तज्ज्ञांचे मत असल्याने यासाठी दिवे येथील शासकीय कोविड केअर सेंटरच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर लहान मुलांसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात येत असल्याचे जगताप म्हणाले.

Web Title: Restrictions will be phased out in Purandar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.