मतदान केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 04:03 AM2020-12-02T04:03:31+5:302020-12-02T04:03:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शिक्षक, पदवीधर निवडणुकीचे मंगळवारी मतदान होणार असून त्यासाठी सोमवारी मध्यरात्रीपासून मतदान केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शिक्षक, पदवीधर निवडणुकीचे मंगळवारी मतदान होणार असून त्यासाठी सोमवारी मध्यरात्रीपासून मतदान केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात येणार आहे.
पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारीत ४९ इमारतीत १५२ मतदान केंद्रे आहेत. मतदान शांततेत पार पाडण्यासाठी मतदान केंद्राच्या परिसरात बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात सोमवारी रात्री १२ वाजल्यापासून प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात येणार आहे. मतदान प्रक्रिया संपेपर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत. मतदान केंद्राच्या परिसरातील जीवनावयक वस्तुंची दुकाने वगळून अन्य दुकाने, उपहारगृहे, टपरी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आदेशाचा भंग करणार्यांविरोधात कारवाई करण्यात येईल, असे सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी सांगितले.
शिक्षक, पदवीधरसाठी मंगळवारी मतदान होणार होणार असून मतमोजणी ३ डिसेंबर रोजी होणार आहे. निवडणूक प्रक्रिया संपेपर्यंत आचारसंहिता लागू राहणार आहे.