दहावीचा पुरवणी परीक्षेचा निकाल ३२.६०
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:10 AM2020-12-24T04:10:59+5:302020-12-24T04:10:59+5:30
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे नोव्हेंबर-डिसेंबर २०२० मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या ...
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे नोव्हेंबर-डिसेंबर २०२० मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला. परीक्षा दिलेल्या ४१ हजार ३९७ विद्यार्थ्यांपैकी १३ हजार ४९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ३२.६० टक्के आहे. मागील वर्षाच्या पुरवणी परीक्षेच्या निकालाच्या तुलनेत यंदा निकालात ९.७४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
दहावीच्या नियमित परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, या उद्देशाने राज्य मंडळातर्फे जुलै- ऑगस्ट महिन्यात पुरवणी परीक्षा घेतली जाते. कोरोनामुळे यंदा जुलै-ऑगस्ट ऐवजी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात परीक्षा घेण्यात आली. परीक्षेसाठी ४४ हजार ८८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. मात्र,४१ हजार ३९७ विद्यार्थ्यांनीच परीक्षा दिली. या परीक्षेत एक किंवा दोन विषय उत्तीर्ण न होऊ शकलेल्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या १९ हजार ८१२ एवढी आहे. हे विद्यार्थी शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये एटीकेटी सवलतीद्वारे इयत्ता अकरावी प्रवेशासाठी पात्र ठरतात.
---------------------
दहावीचा विभागीय मंडळनिहाय निकाल
पुणे : ३०.७६,नागपूर : २९.५२,औरंगाबाद : ३९.११, मुंबई : २९.८८, कोल्हापूर : ३०.१७ ,अमरावती : ३२.५३, नाशिक : ३७.४२, लातूर : ३३.५९, कोकण: ३४.०५
-----------------
दहावीचा विद्यार्थ्यांची विभागीय मंडळनिहाय उत्तीर्णतेचीआकडेवारी
मंडळाचे नाव प्रविष्ठ उत्तीर्ण
पुणे ६,०९७ १,८७४
नागपूर ३,७६४ १,१११
औरंगाबाद ६,३३६ २,४७८
मुंबई १२,६४६ ३,७७९
कोल्हापूर २,६५५ ८०१
अमरावती २,३१५ ७५३
नाशिक ३,८८० १,४५२
लातूर ३,३८२ १,१३६
कोकण ३२३ १११
----------------------------------------