नीरा केंद्रातील चारही शाळांचा निकाल १०० टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:09 AM2021-07-18T04:09:24+5:302021-07-18T04:09:24+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परिक्षा थेट झाली नसली तरी, परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. यामध्ये नीरा ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परिक्षा थेट झाली नसली तरी, परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. यामध्ये नीरा येथील केंद्राचा शेकडा निकाल १०० टक्के लागला आहे. नीरा केंद्राअंतर्गत चार शाळांचे विध्यार्थी परीक्षेला बसले होते.
त्यापैकी सर्व विध्यार्थी उतीर्ण झाले. केंद्रात हर्षदा वसंतराव यादव ९७.४० गुण मिळवत पहिली, सानिया असलम मणेर ९६.०० टके गुण मिळवून दुसरी तर, माजिद समिर तांबोळी व निखिल प्रकाश गायकवाड ९५.६० टक्के गुण मिळवत तीसरा आला आहे.
नीरा येथील दहावीच्या केंद्रावर एकूण चार विद्यालयातील मुलांनी परीक्षा दिली होती. यामध्ये महात्मा गांधी विध्यालाय नीराचे सर्व विध्यार्थी उत्तीर्ण झाले व विद्यालायाचा निकाल १०० टक्के लागला. विद्यालायात ९५.६० टक्के गुण मिळवून माजिद समिर तांबोळी प्रथम आला, तर तो केंद्रात तीसरा आला, नयन सुर्यकांत धायगुडे हा ९३.२० टक्के गुण मिळवून विद्यालयात दुसरा तर आकाश शिवाजी धायगुडे ९२.८० टक्के गुण मिळवुन तिसरा आला. लीलावती रीखवलाल शहा कन्या विद्यालय नीरा ची हर्षदा वसंतराव यादव ही ९७.४० टक्के गुण मिळवुन केंद्रात व विद्यालायात पहिली आली. सानिया असलम मणेर ९६.०० टक्के गुण मिळवुन विद्यालयात व केंद्रात दुसरी आली. सायली हनुमंत कचरे ९४.६० टक्के गुण मिळवुन विद्यालयात तिसरी आली. विद्यालायाचा एकूण निकाल १०० टक्के लागला.
गुळुंचे येथील ज्योतिर्लिंग विद्यालयाचे सर्व विद्यार्थी पास झाले. विद्यालयाचा एकूण निकाल १०० टक्के लागला. सानिका संतोष निगडे ९२.६० टक्के गुण मिळवुन विद्यालयात पहाली आली. प्रियंका अनिल निगडे ९१.६० टक्के गुण मिळवून दुसरी तर तन्वी गणपत गदादे ९१.२० टक्के गुण मिळवत तीसरी आली आहे.
पिंपरे (खुर्द) येथील बाबालाल साहेबराव काकडे विद्यालयातीलही सर्व विद्यार्थी पास झाले. विद्यालायाचा शेकडा निकाल १०० टक्के लागला. निखिल प्रकाश गायकवाड हा ९५.६० गुण मिळवुन विद्यालयात प्रथम तर केंद्रात तीसरा आला, सायली संभाजी थोपटे ९१.८० टक्के गुण मिळवून दुसरी तर अंजना श्रीहरी यादव ८९.०० टक्के गुण मिळवुन तिसरी आली आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे नीरेच्या सरपंच तेजश्री काकडे,उपसरपंच राजेश काकडे, नीरा स्कूल कमिटीचे सदस्य व सल्लागार लक्ष्मणराव चव्हाण, पंचायत समिती सदस्य गोरख माने, गुळुंचेचे उपसरपंच प्रविण निगडे, पुरंदर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सतीश उरसळ, कार्यध्यक्ष अजित निगडे, सचिव उत्तम निगडे, पिंपरेचे सरपंच उत्तम थोपटे, शिक्षण संस्थेचे प्रमुख सतीश काकडे, सचिव मदन काकडे, महात्मा गांधी महाविध्यालायाचे मुख्यध्यापक गोरख थिटे, लिलावती री. शहा कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका सुवर्णा बोडरे, बाबलाल काकडे विद्यालय पिंपरे (खुर्द) चे मुख्याध्यापक कैलास नेवसे, ज्योतिर्लींग विद्यालयाचे मुख्याध्यापक नागनाथ ओव्हाळ आदींनी अभिनंदन केले