विज्ञानदिनी चार राज्यांतील सहाशे प्रयोगांच्या स्पर्धेचा निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:20 AM2021-02-28T04:20:20+5:302021-02-28T04:20:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: राष्ट्रीय विज्ञानदिनी उद्या चार राज्यांतील शालेय विद्यार्थ्यांच्या शास्त्रीय प्रयोग स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: राष्ट्रीय विज्ञानदिनी उद्या चार राज्यांतील शालेय विद्यार्थ्यांच्या शास्त्रीय प्रयोग स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्रासह आंध्र, राजस्थान व ओडिसा या चार राज्यांतून या स्पर्धेसाठी साडेसहाशे प्रयोग आले होते.
शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाचा प्रसार व्हावा, प्रेम वाढावे यासाठी दिनेश निसंग व सुयश दाते या दोन युवकांनी स्थापन केलेल्या संडे सायन्स स्कूल संस्थेने या प्रयोग स्पर्धेचे आयोजन केले होते. सन २००८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेचे काम आता १० राज्यांमध्ये ६० केंद्र व त्यांच्यासारख्याच अनेक विज्ञानप्रेमी युवक शिक्षकांच्या माध्यमातून सुरू आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे हे सगळेच ठप्प झाले होते. त्यावर उपाय म्हणून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती असे निसंग यांनी सांगितले.
यात विद्यार्थ्यांना प्रयोग साहित्य संस्थेकडून पाठवण्यात आले होते. बहुसंख्य प्रयोग भौतिक शास्त्रातील होते. साहित्यासाठी माफक शुल्क आकारणी करण्यात आली. चार राज्यांमधून साडेसहाशे विद्यार्थ्यांनी या स्पर्धेसाठी प्रयोग पाठवले. ते अर्थातच संस्थेने पाठवलेले साहित्य वापरून घरातच केलेले होते.
या स्पर्धेचा रविवारी विज्ञान दिनाच्या निमित्ताने या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत चालला आहे तो लक्षात घेऊन संस्था वेगवेगळ्या पद्धतीने आपले विज्ञान प्रसाराचे काम सुरूच ठेवणार आहे, असे निसंग यांनी सांगितले.