पार्किंग प्रश्नाचा निकाल लागेना, अंतर्गत वाहतूककोंडीने पक्षकार व वकील त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 01:31 AM2018-07-16T01:31:36+5:302018-07-16T01:31:47+5:30

कौटुंबिक व सामाजिक प्रश्न मिटविण्यासह अनेक कामांसाठी शिवाजीनगर न्यायालयात दररोज हजारो नागरिक ये-जा करीत असतात.

The result of the parking question was not met, the party workers and the lawyer suffered due to the traffic | पार्किंग प्रश्नाचा निकाल लागेना, अंतर्गत वाहतूककोंडीने पक्षकार व वकील त्रस्त

पार्किंग प्रश्नाचा निकाल लागेना, अंतर्गत वाहतूककोंडीने पक्षकार व वकील त्रस्त

Next

पुणे : कौटुंबिक व सामाजिक प्रश्न मिटविण्यासह अनेक कामांसाठी शिवाजीनगर न्यायालयात दररोज हजारो नागरिक ये-जा करीत असतात. आपले प्रश्न सोडविण्यासाठी न्यायालयात दाखल होताच त्यांना गाडी कुठे पार्क करायची ही समस्या भेडसावत आहे. पार्किंगचा प्रश्न सोडविण्यासाठी न्यायालयातील काही वकीलांना अनेक मार्ग सुचवले. पुणे जिल्हा बार असोसिएशनकडून त्याबाबत पाठपुरावा करण्यात आला. मात्र अद्याप याप्रश्नी एकही मार्ग निघालेला नाही.
न्यायालयात येणाऱ्या व्यक्ती सध्या गेट नंबर ४ ते अगदी गेट नंबर १ पर्यंत भितींच्या आतील बाजून सर्व प्रकारची वाहने पार्क करीत आहे. तर आत जागा शिल्लक राहत नसल्याने पर्यायाने कामगार पुतळा रस्त्यालगतची जागा आणि संचेती हॉस्पिटलकडून पुणे स्टेशनकडे जाणाºया रस्त्यावर वाहने लावली जातात. या सर्वांत काही पक्षकार व वकील मिळेल जागा मिळेल त्या ठिकाणी वाहने लावतात. त्यामुळे न्यायालयाच्या आत व बाहेर देखील वाहतूककोंडी होत असते. न्यायालयात लोकअदालत किंवा इतर काही कार्यक्रम असल्यास पार्किंगसाठी जागाच उपलब्ध होत नाही.
अगदी न्यायालयाला चक्कर मारल्यानंतर एखाद्या ठिकाणी जागा मिळते. त्यामुळे पार्किंगसाठी आवश्यक असलेली जागा वाढवा किंवा पर्यायी जागा उपलब्ध करा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र हा प्रश्नदेखील न्यायालयात दाखल होणाºया प्रकरणांप्रमाणे अनेक वर्षांपासून निकाली लागलेला नाही.
याबाबत वकिलांनी सुचवलेल्या पर्यायांवर विचार झाल्यास आणि त्याबाबत पाठपुरावा केला तर पार्किंगची समस्या नक्कीच
मिटेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
।रोडमॅपची अंमलबजावणी
सध्या उपलब्ध असलेली पार्किंगच्या जागेचे नियोजन करण्यासाठी काही वर्षांपासून असोसिएशनच्या माध्यमातून न्यायालय परिसरातील रस्त्यांचे आरटीओकडून रोडमॅपिंग करण्यात आले होते. काही ठिकाणी सम-विषम पार्किंग, नो इंट्री आदी बदल करण्यात आले होते. तसेच वाहतुकीच्या नियोजनसाठी काही वाहतूक पोलीस न्यायालयात असावे, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र अद्याप त्याबाबत कोणतेही ठोस निर्णय झालेले नाही.
।बेकायदा पार्किंग रोखावी
न्यायालयातील पार्किंग ही सर्वांसाठी खुली आली आहे. तसेच
या ठिकाणी वाहन लावण्यासाठी पैसेदेखील आकारण्यात येत नाही. त्यामुळे शहरात काम असलेल्या अनेक व्यक्ती या ठिकाणी आपले वाहन पार्क करून जातात.
दररोज सुमारे ३० दुचाकी आणि १० चारचाकी अशा पद्धतीने पार्क करण्यात येत असल्याची माहिती असोसिएशनच्या पदाधिकाºयांनी दिली. ही वाहने रोखली तरी काही जागा रिकामी राहू शकते.
>न्यायाधिशांची वाहने कौटुंबिक न्यायालयात
कौटुंबिक न्यायालयातील पार्किंग सुरक्षित असल्याने न्यायाधिशांची वाहने त्या ठिकाणी लावण्यात यावीत, असा प्रस्ताव गेल्या वर्षी असोसिएशनकडून देण्यात आला होता. न्यायाधिशांची वाहने कौटुंबिक न्यायालयात पार्क केल्यास गेटनंबर चार समोरील, स्मॉल कॉस न्यायालयाजवळील आणि नवीन इमारतीच्या तळमजल्यातील जागा इतरांना वापरणे शक्य होईल, असे त्या प्रस्ताव नमूद करण्यात आले होते.
एक वकील एक गाडी
पावसाचा त्रास नको म्हणून सध्या अनेक वकील चारचाकी वाहन घेऊन न्यायालयात येत आहे. त्यामुळे मोठ्या वाहनांचा प्रश्न निर्माण होतो. त्याऐवजी प्रत्येक वकिलाने स्वतंत्र वाहन न आणता आपल्या सहकाºयांनादेखील घेऊन यावे. तसेच संगमपुलाजवळ पाण्याचा प्रवाह कमी असताना त्या ठिकाणीदेखील वाहने लावता येवू शकता. ही जागा न्यायालयापासून दूर असली तरी गर्दी कमी करण्यासाठी पर्याय ठरू शकतो.
कौटुंबिक न्यायालय
इमारतीचे उद्घाटन होऊन ११ महिने उलटले तरी अद्याप येथील पार्किंग सुरू झालेले नाही. पे अ‍ॅन्ड पार्क करायचे की मोफत सुविधा पुरवायची यावरून सुरू झालेल्या वादात अद्यात पार्किंग बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे कौटुंबिक न्यायालयात प्रॅक्टीस करणारे वकील, पक्षकार शिवाजीनगर न्यायालयात गाडी पार्क करतात. दोन मजल्यांचे पार्किंग बंद असल्याने वकीलवर्गामध्ये मोठी नाराजी आहे. पे अ‍ॅन्ड पार्क असले तरी चालेल किमान ते सुरू तर करा, अशी वकील करीत आहेत.
>बराखीची जागा
न्यायालयातील पोलीस चौकी ते पुणे बार असोसिएशनच्या कॅन्टीनपर्यंतच्या जागेत नवीन प्रशस्त इमारत उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि न्यायालय प्रशासनाकडून पाहणीदेखील करण्यात आली आहे. सर्व परवानग्यांची पूर्तता झाल्यानंतर या जागेवरील बराकी पाडून त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या १.५ एफएसआय नियमानुसार १५ हजार १२० चौरस मीटर बांधकाम करता येऊ शकते.
>रेल्वे ट्रॅक
संचेती चौक ते कामगार पुतळ्यापासून असलेल्या रेल्वे ट्रॅक शेजारच्या मोकळ््या जागेवर सध्या चारचाकी वाहने पार्क करण्यात येत आहेत. या ठिकाणी बहुमजली इमारत उभारण्यात आली तर अनेक वाहने त्या ठिकाणी पार्क होऊ शकतात. न्यायालय प्रशासन आणि पुणे बार असोसिएशनने पाठपुरावा करावा करणे गरजेचे असल्याचे वकिलांनी सांगितले. बहुमजली इमारत उभारून त्यात पे अ‍ॅन्ड पार्क सुरू करावे. त्या माध्यमातून उत्पन्न मिळेल व वाहनांच्या सुरक्षेच्या दृष्टिने आवश्यक असलेल्या बाबीदेखील त्या ठिकाणी लावता येतील, असे त्यांनी सुचवले. अशीच एक जागा रेल्वे कॅन्टीनदेखील जवळ आहे.

Web Title: The result of the parking question was not met, the party workers and the lawyer suffered due to the traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे