सेट परीक्षेचा निकाल ३.९२ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 03:12 AM2017-08-11T03:12:24+5:302017-08-11T03:12:24+5:30
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे १६ एप्रिल २०१७ रोजी घेण्यात आलेल्या सेट परीक्षेचा निकाल गुरुवारी दुपारी २ वाजता जाहीर झाला आहे.
पुणे : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे १६ एप्रिल २०१७ रोजी घेण्यात आलेल्या सेट परीक्षेचा निकाल गुरुवारी दुपारी २ वाजता जाहीर झाला आहे. परीक्षेचा एकूण निकाल ३.९२ टक्के लागला असून उत्तीर्ण विद्यार्थ्यांना महिन्याभरात प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाते. एप्रिल महिन्यात झालेल्या
परीक्षेस ६९ हजार १८६ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यातील २ हजार ७१० विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले असून सहायक प्राध्यापक पदासाठी पात्र ठरले आहेत.
विद्यापीठातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंतिम निकालाबाबत विद्यार्थ्यांना काही तक्रार असल्यास आॅनलाईन अर्ज भरून पाच हजार रुपयांच्या डिमांड ड्राफ्टसह महिन्याभरात जमा करता येईल. तसेच पात्र विद्यार्थ्यांना एका महिन्याच्या आत आपली कागदपत्रे सेट विभागाकडे सादर करावे लागतील. त्याचप्रमाणे परीक्षेस प्रविष्ठ होताना पदव्युत्तर प्रमाणपत्र जमा न केलेल्या विद्यार्थ्यांनासुद्धा सेट परीक्षेचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी पदव्युत्तर प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
४सेट विभागातर्फे काही महिन्यांपूर्वी जाहीर करण्यात आलेल्या उत्तरसूचीवर आपेक्ष मागविण्यात आले होते. त्यावर ११६ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. उत्तरसूचीवरील आक्षेपांची दखल घेऊन अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. गेल्या वर्षी घेण्यात आलेल्या परीक्षेदरम्यान अनेक विद्यार्थ्यांनी चुकीचे कोडिंग केले होते. ही चूक एप्रिल महिन्यात घेतलेल्या परिक्षेतही अनेक विद्यार्थ्यांनी केली आहे.