बारावी फेरपरीक्षेचा उद्या निकाल, दुपारी १ वाजता मंडळाच्या संकेतस्थळावर होणार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 02:36 AM2017-08-20T02:36:25+5:302017-08-20T02:37:42+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत जुलैमध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल २१ आॅगस्ट रोजी आॅनलाईन जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना २४ आॅगस्ट रोजी महाविद्यालयांमध्ये गुणपत्रिकांचे वाटप केले जाणार आहे.
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत जुलैमध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल २१ आॅगस्ट रोजी आॅनलाईन जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना २४ आॅगस्ट रोजी महाविद्यालयांमध्ये गुणपत्रिकांचे वाटप केले जाणार आहे.
यंदा ११ ते २८ जुलै या कालावधीत फेरपरीक्षा घेण्यात आली. त्याचा निकाल २१ आॅगस्ट रोजी दुपारी १ वाजता मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर केला जाणार आहे. संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण उपलब्ध होणार असून त्याची प्रिंट आऊटही घेता येईल. गुणांची पडताळणी करण्यासाठी २२ ते ३१ आॅगस्ट या कालावधीत तर उत्तरपत्रिकांची छायाप्रत प्राप्त करण्यासाठी ११ सप्टेंबरपर्यंत विभागीय मंडळाकडे शुल्कासह अर्ज करावा लागेल, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी दिली.