राज्यातील ९८.३२ टक्के शाळांचा निकाल १०० टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:09 AM2021-07-17T04:09:32+5:302021-07-17T04:09:32+5:30
पुणे : शाळेचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागावा, यासाठी प्रत्येक शाळेकडून प्रयत्न केले जातात. परंतु, यंदा विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन ...
पुणे : शाळेचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागावा, यासाठी प्रत्येक शाळेकडून प्रयत्न केले जातात. परंतु, यंदा विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन निकाल तयार करण्याची जबाबदारी शाळांकडेच होती. त्यामुळे काही अपवाद वगळता अनेक शाळांनी या संधीचा फायदा घेतला. परिणामी यावर्षी राज्यातील ९८.३२ टक्के शाळांचा शंभर टक्के, तर केवळ ९ शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे.
राज्य मंडळाकडून प्राप्त झालेल्या आकडेवाडीनुसार राज्यातील एकूण २२ हजार ७६७ शाळांपैकी २२ हजार ३८४ शाळांचा निकाल १०० टक्के तर, ३५२ शाळांचा निकाल ९० ते १०० टक्क्यांच्या दरम्यान आहे. तर केवळ १४ शाळांचा निकाल ८० ते ९० टक्क्यांच्या दरम्यान आहे. तसेच ८ शाळांचा निकाल ५० ते ८० टक्क्यांच्या दरम्यान आहे.
पुणे विभागातील २, नागपूर विभागातील ४, तर मुंबई विभागाचा निकाल २ आणि नाशिक विभागातील एका शाळेचा निकाल शून्य टक्के लागला आहे.
--------------------------
शाळांकडून तयार करण्यात आलेला निकाल वस्तुस्थितीला धरूनच आहे. इयत्ता नववीचे गुण आणि दहावीचे अंतर्गत गुण या आधारावर निकाल प्रसिद्ध झाला. त्यामुळे आपोआपच शाळांचा निकाल वाढला आहे.
- हरिश्चंद्र गायकवाड, अध्यक्ष, मुख्याध्यापक संघ, पुणे