इंजिनीअरिंग फार्मसी सीईटी चा निकाल जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2020 04:05 AM2020-11-29T04:05:24+5:302020-11-29T04:05:24+5:30
पुणे: राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे अभियांत्रिकी , औषधनिर्माणशास्त्र व कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर ...
पुणे: राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे अभियांत्रिकी , औषधनिर्माणशास्त्र व कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. परीक्षेत पुण्याच्या संगीता गुमस्ते आणि सौरभ जोग यांनी पीसीएम ग्रुप मध्ये १०० पर्सेंटाइल गुण मिळवले आहेत. तर पीसीबी ग्रुपमध्ये अनिश जगदाळे याने शंभर पर्सेंटाइल गुण मिळवून यश संपादन केले आहे.
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने राज्यातील ३७ जिल्ह्यांमध्ये १३८ परीक्षा केंद्रांवर आणि महाराष्ट्र बाहेर १० अशा १९७ परीक्षा केंद्रावर ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेतली होती. परीक्षेसाठी ५ लाख ४२ हजार ४३१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ३ लाख ८६ हजार ६०४ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. परीक्षेस ७१.२७ टक्के विद्यार्थी उपस्थित तर २८.७३ टक्के विद्यार्थी अनुपस्थित होते. त्यातही १ लाख ७४ हजार ६७९ विद्यार्थी पीसीएम ग्रुपसाठी तर २ लाख ११ हजार ९२५ विद्यार्थी पीसीबीग्रुपची परीक्षा दिली होती. सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शनिवारी रात्री निकाल जाहीर करण्यात आला असून पीसीएम ग्रुप मधील २२ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल तर पीसीबी ग्रुप मधील १९ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल गुण मिळाले आहेत.