अनुवादात भाषेचे सौंदर्य जपावे
By admin | Published: April 24, 2017 05:13 AM2017-04-24T05:13:35+5:302017-04-24T05:13:35+5:30
भाषिक अनुवादाचे विश्व झपाट्याने विस्तारत आहे. दर्जेदार अनुवादनासाठी अनुवादकांनी दर्जाबाबत सातत्य राखले पाहिजे. ज्या विषयात
पुणे : भाषिक अनुवादाचे विश्व झपाट्याने विस्तारत आहे. दर्जेदार अनुवादनासाठी अनुवादकांनी दर्जाबाबत सातत्य राखले पाहिजे. ज्या विषयात अनुवाद केला जातो, त्याचे सखोल ज्ञान, वेळेवर काम पूर्ण करून देण्याची क्षमता आणि भाषिक सौंदर्य ज्याला जपता येते, तो यशस्वी अनुवादक म्हणता येऊ शकतो, असा सूर खुल्या परिसंवादात उमटला.
असोसिएशन आॅफ लँग्वेज प्रोफेशनल्स आणि एल्टीस-सिफिल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बिहार्इंड दा स्क्रीन’ या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. असोसिएशन आॅफ लँग्वेज प्रोफेशनल्सच्या प्रमुख ललिता मराठे आणि केतकी नवाथे यांनी, अनुवाद एजन्सीतर्फे प्रतिनिधित्त्त्व करत असलेल्या लँग्वेज सर्व्हिसेस ब्युरोच्या देवकी कुंटे आणि जर्मन भाषातज्ज्ञ रसिका गुमास्ते, मराठी भाषातज्ज्ञ पूर्णिमा कुंदेतकर यांच्याशी संवाद साधला. (प्रतिनिधी)