रेल्वेत नोकरीच्या आमिषाने निवृत्त लष्करी जवानाची फसवणूक; महिलेसह दोघांविरुद्ध गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 13:07 IST2024-12-30T13:07:09+5:302024-12-30T13:07:28+5:30

निवृत्त जवानाकडून रेल्वेतील नोकरी आणि औषधोपचारासाठी असे १७ लाख २७ हजार रुपये तिने घेतले

Retired army jawan cheated with the lure of a job in the railways Case registered against two including a woman | रेल्वेत नोकरीच्या आमिषाने निवृत्त लष्करी जवानाची फसवणूक; महिलेसह दोघांविरुद्ध गुन्हा

रेल्वेत नोकरीच्या आमिषाने निवृत्त लष्करी जवानाची फसवणूक; महिलेसह दोघांविरुद्ध गुन्हा

पुणे : रेल्वेत टीसी (तिकीट तपासनीस) पदावर नोकरी लावण्याच्या आमिषाने एका निवृत्त लष्करी जवानाची १७ लाख २७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी संजीवनी पाटणे (२७, रा. केदारी पेट्रोलपंपाजवळ, वानवडी) आणि शुभम मोड (रा. येवलेवाडी) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका निवृत्त जवानाने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संजीवनी पाटणे हिने निवृत्त जवानाला रेल्वेत टीसी असल्याची बतावणी केली होती. फिर्यादी यांची भाची आणि पुतणीला रेल्वेत नोकरी लावते, असे सांगून त्यांच्याकडून पैसे घेतले. फिर्यादी यांच्या भाचीला रेल्वेतील नियुक्तीचे बनावट पत्र दिले, तसेच पुतणीला नोकरीस लावल्याबाबत पैसे भरल्याची बँकेची बनावट कागदपत्रे मोबाइलवर पाठवली. पाटणेने तिच्या पतीला गंभीर आजार असल्याचे सांगितले. औषधोपचाराच्या नावाखाली त्यांच्याकडून वेळोवेळी पैसे घेतले. रेल्वेतील नोकरी आणि औषधोपचारासाठी असे १७ लाख २७ हजार रुपये तिने घेतले. नोकरी न मिळाल्याने तिच्याकडे विचारणा करण्यात आली. तेव्हा तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

Web Title: Retired army jawan cheated with the lure of a job in the railways Case registered against two including a woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.